agriculture news in Marathi tur procurement affected by CORONA Maharashtra | Agrowon

नगर : ‘कोरोना’ संसर्गाच्या भीतीने तूर खरेदीचा वेग मंदावला 

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 मार्च 2020

हमी दराने तूर, हरभऱ्याची खरेदी सुरू आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून तूर व हरभरा खरेदीला काहीसा ब्रेक लागला आहे.

नगर ः हमी दराने तूर, हरभऱ्याची खरेदी सुरू आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून तूर व हरभरा खरेदीला काहीसा ब्रेक लागला आहे. तुरीची खरेदी करण्यासाठी केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून एकाच वेळी नाही तर टप्प्याने शेतकऱ्यांना बोलावले जात आहे. एसएमएस दिलेले असले तरी सध्या हरभरा खरेदी स्थगित असल्याचे सांगितले जात आहे. 

यंदा राज्यात जवळपास एकशे साठ खरेदी केंद्रावर तूर खरेदी केली जात आहे. नगर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत ४६ हजार ५५० क्विंटल तुरीची ७ हजार ५४४ शेतकऱ्यांकडून खरेदी केली आहे. अजून पन्नास टक्के शेतकरी विक्री करायचे राहिले आहेत. तूर खरेदी सुरू असलेल्या केंद्रावर आता हरभरा खरेदीसाठी नोंदणी केली जात आहे. आतापर्यंत सव्वा बाराशे शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 

तूर, हरभरा खरेदी केंद्रांवर माल घेऊन विक्रीला येण्यासाठी मोबाईलवर संदेश दिले जातात. तूर विक्रीला आणावी म्हणून १३ हजार शेतकऱ्यांना तर हरभरा विक्रीला आणावा म्हणून साधारण पावणेदोनशे शेतकऱ्यांना एसएमएस पाठवले आहेत. मात्र, गेल्या चार दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने व प्रशासनाने गर्दी न करण्याचे आवाहन केल्याने हरभरा, तूर खरेदीला काहीसा ब्रेक लागल्याचे पाहायला मिळत आहे.

केंद्रचालकांनी अनेक शेतकऱ्यांना तूर, हरभरा विक्रीला आणावा यासाठीचे एसएमएस दिलेले असले तरी दहा-दहा शेतकऱ्यांचे ग्रुप केले असून दर तासाला दहापेक्षा अधिक शेतकरी केंद्रावर येणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. 

आलेल्या दहा शेतकऱ्यांची खरेदी संपल्यानंतर पुढील शेतकऱ्यांना बोलावले जात आहे. त्यामुळे खरेदीचा वेग कमी झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे सध्या तूर खरेदीचा वेग मंदावला आणि हरभरा खरेदी थांबलेली असली तरी संसर्गाची बाधा वाढण्याचा अंदाज दिसला तर तूर खरेदीही थांबू शकते असे दिसत आहे. तूर खरेदी २९ मार्चपर्यंत होणार असून १५ एप्रिलपर्यंत नोंदणीची मुदत वाढवली असल्याने खरेदीलाही मुदत वाढ मिळणार असल्याचे सांगितले. 

हरभरा खरेदी सध्या नाही 
हमी केंद्रावर हरभरा खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरू आहे. आत्तापर्यंत साधारण १२६७ शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केलेली असून त्यातील पावणेदोनशे शेतकऱ्यांना एसएमएसही दिलेले आहेत. मात्र, तूर खरेदी केंद्रावरच हरभरा खरेदी केली जात आहे. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खरेदी केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घेत सध्या हरभरा खरेदी काही दिवसासाठी स्थगित केली आहे. आत्तापर्यंत फक्त कर्जत येथील केंद्रावर तीन शेतकऱ्यांची १५ क्विंटल खरेदी झाली असल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...