agriculture news in marathi, tur procurement stop, yavatmal, maharashtra | Agrowon

यवतमाळ जिल्ह्यात नाफेडची तूर खरेदी बंद
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 एप्रिल 2019

यवतमाळ  : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात तूर खरेदीचा चांगलाच बोजवारा उडाला आहे. यंदाही तशीच स्थिती होती. अनेक अडचणींमुळे पाहिजे त्या प्रमाणात तूर खरेदी सुरूच झाली नाही. रविवारपर्यंत (ता. २१) नाफेडच्या तूर खरेदीची मुदत होती. आजपासून (सोमवार) नाफेडची तूर खरेदी बंद होणार आहे.

यवतमाळ  : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात तूर खरेदीचा चांगलाच बोजवारा उडाला आहे. यंदाही तशीच स्थिती होती. अनेक अडचणींमुळे पाहिजे त्या प्रमाणात तूर खरेदी सुरूच झाली नाही. रविवारपर्यंत (ता. २१) नाफेडच्या तूर खरेदीची मुदत होती. आजपासून (सोमवार) नाफेडची तूर खरेदी बंद होणार आहे.

जिल्ह्यात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना तुरीने बऱ्यापैकी तारले. असे असले तरी तूर विकताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत असल्याचे चित्र आहे. कधी बारदाना नाही, कधी गोदाम फुल्ल तर कधी ग्रेडरची अडचण असते. यंदा तर खरेदी विक्री संघाची थकीत रक्कम दिली नसल्याने तूर खरेदीच सुरू झाली नाही. जिल्ह्यात यावर्षी खूप उशिरा तूर खरेदी सुरू झाली.

खरेदी सुरू होताच नाफेडची मुदत संपण्याची वेळ येऊन ठेपली तरी पाहिजे त्या प्रमाणात खरेदीला गती मिळाली नाही. अनेक अडचणींमुळे शेतकऱ्यांना खासगी बाजारात हमीभावापेक्षा कमी भावात तुरीची विक्री करण्याची वेळी आली. अशातच रविवारी (ता. २१) नाफेडची तूर खरेदीची अंतिम मुदत संपली. मात्र, अजूनही शेतकऱ्यांच्या घरांत तूर शिल्लक आहे. नाफेडची खरेदी बंद झाल्यास खासगी बाजारात दर पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आता शासन या संदर्भात काय निर्णय घेणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

खविसंचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
जिल्ह्यात नाफेडची खरेदी उशिरा सुरू झाली. अशातच मुदत संपत असल्याने शेतकऱ्यांची अडचण होण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तूर खरेदीची मुदत वाढवून देण्याची मागणी जिल्ह्यातील खरेदी विक्री संघाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या वेळी प्रवीण देशमुख, दत्तकुमार दरणे, अंकुश राऊत, शशिकांत देशमुख, बंडू कापसे, मिलिंद इंगोले, अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.
 
३० दिवस मुदतवाढीचा प्रस्ताव
शेतकऱ्यांना अडचण येऊ नये, म्हणून फेडरेशनने मुदतवाढीचा प्रस्ताव नाफेडकडे पाठविला आहे. या शिवाय सहायक निबंधक कार्यालयही एक महिना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...