तीन जिल्ह्यांत ५४ हजार क्विंटल तूर खरेदी

तूर खरेदी
तूर खरेदी
नांदेड :  केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पहिल्या महिनाभरात बुधवारपर्यंत (ता.२८) ५३३५ शेतकऱ्यांची ५४ हजार ५९३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. या तीन जिल्ह्यांतील ३५ हजार १८६ शेतकऱ्यांनी २२ शासकीय खरेदी केंद्रांवर आॅनलाइन नोंदणी केली आहे, अशी माहिती विपणन अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.
 
नांदेड जिल्ह्यात नांदेड (अर्धापूर), लोहा, मुखेड, देगलूर, बिलोली, नायगाव, भोकर, किनवट, हदगाव या ठिकाणी नाफेडतर्फे तर धर्माबाद येथे विदर्भ को-आॅपरेटिव्ह फेडरेशनतर्फे तूर खरेदी केली जात आहे. आजवर या खरेदी केंद्रांवर १४ हजार ३४५ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. बुधवारपर्यंत या सर्व खरेदी केंद्रांवर ३४२२ शेतकऱ्यांची ३४ हजार ४२१.१६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.
 
यामध्ये नांदेड (अर्धापूर) येथील खरेदी केंद्रांवर ४०८ शेतकऱ्यांची ४५२५.५०, लोहा येथे १८२ शेतकऱ्यांची १९४४, मुखेड येथे २१३ शेतकऱ्यांची २३४७, नायगाव येथे ४४५  शेतकऱ्यांची ४५१२, बिलोली येथे ४३१ शेतकऱ्यांची ४४७०.६८, देगलूर येथे ३१० शेतकऱ्यांची ३९६५.५०, भोकर येथे २५० शेतकऱ्यांची २५३२, किनवट येथे ५७१ शेतकऱ्यांची ४४६४.४८, हदगाव येथे २१२ शेतकऱ्यांची २०६०, धर्माबाद येथे ४०० शेतकऱ्यांची ३६०० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.
 
परभणी जिल्ह्यात नाफेडच्या ६ आणि विदर्भ को- मार्केटिंग फेडरेशनच्या एका अशा एकूण ७ तूर केंद्रांवर ११४०५  शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. बुधवारपर्यंत नाफेडच्या परभणी येथील केंद्रावर ५२ शेतकऱ्यांची ९८६ , बोरी येथे २३ शेतकऱ्यांची ३७६.५०, जिंतूर येथे १४२ शेतकऱ्यांची १५९४, सेलू येथे १२१ शेतकऱ्यांची १७९०.५०, गंगाखेड येथे १२६ शेतकऱ्यांची १८९६, पूर्णा येथे १०६ शेतकऱ्यांची १५९५.५० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.
 
मानवत येथील विदर्भ को- मार्केटिंग फेडरेशनच्या खरेदी केंद्रावर १६८ शेतकऱ्यांची २१०० क्विंटल अशी परभणी जिल्ह्यातील ७ केंद्रांवर एकूण ७६८ शेतकऱ्यांची १०,३२८.५० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.
 
हिंगोली जिल्ह्यातील ५ खरेदी केंद्रांवर ९४३६ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. बुधवारपर्यंत या ५ खरेदी केंद्रांवर ११४५ शेतकऱ्यांची ९८४९.५० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यामध्ये हिंगोली येथील ८८ शेतकऱ्यांच्या १०२५, कळमनुरी येथील ३०९ शेतकऱ्यांच्या २३१०, वसमत येथील १९५ शेतकऱ्यांच्या ९९८.५०, जवळा बाजार येथील ३१८ शेतकऱ्यांच्या २७६६, सेनगाव येथील २५५ शेतकऱ्यांच्या २७५० क्विंटल तुरीचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com