शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या
बातम्या
तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता जाहीर
केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत यंदाच्या (२०२०-२१) हंगामात शासकीय केंद्रांवर तूर खरेदीसाठी राज्यातील ३४ जिल्ह्यांसाठी निश्चित करण्यात आलेली प्रतिहेक्टरी उत्पादकता जाहीर करण्यात आली आहे.
परभणी ः केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत यंदाच्या (२०२०-२१) हंगामात शासकीय केंद्रांवर तूर खरेदीसाठी राज्यातील ३४ जिल्ह्यांसाठी निश्चित करण्यात आलेली प्रतिहेक्टरी उत्पादकता जाहीर करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यासाठी सर्वाधिक २० क्विटंल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सर्वांत कमी ४ क्विंटल उत्पादकता आहे.
२०२०-२१ मधील खरीप हंगामात किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत २ लाख ८९ हजार ५० टन तूर खरेदीचे उद्दिष्ट आहे.त्यासाठी नाफेड तर्फे राज्य सहकारी पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ, महाएफपीसी अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या खरेदी केंद्रांवर २८ डिसेंबर पासून शेतकरी नोंदणी सुरु करण्यात आली आहे.
या केंद्रांवर तूर खरेदी व्यवस्थित व सुरळीतपणे होण्यासाठी कृषी विभागाच्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार जिल्हानिहाय उत्पादकतेनुसार प्रति शेतकरी तूर खरेदी करण्यात यावी असे आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अवर सचिव सुनंदा घड्याळे यांनी राज्य सहकारी पणन महासंघाचे (मुंबई) व्यवस्थापकीय संचालक, विदर्भ सहकारी पणन महासंघाचे (नागपूर) कार्यकारी संचालक, महाएफपीसीचे (पुणे) चे व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत.
तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी उत्पादकता (क्विंटलमध्ये)
जिल्हा : उत्पादकता
औरंगाबाद : ८.११
जालना : २०.००
परभणी : ६.५०
हिंगोली : ८.१५
नांदेड : ८.५०
लातूर : ६.२०
उस्मानाबाद : ६.८०
बीड : १५.७५
ठाणे : ५.४८
पालघर : ४.४४
रायगड : ५.८६
रत्नागिरी : ४.१५
सिंधुदुर्ग : ४.००
नाशिक : १२.९६
धुळे : ५.५०
नंदुरबार : ५.५०
जळगाव : १२.३४
नगर : ९.५०
पुणे : ६.२०
सोलापूर : ८.८९
सातारा : १२.००
सांगली : ७.३२
कोल्हापूर : १०.७५
अमरावती : ५.००
अकोला : १२.००
बुलडाणा : ९.२७
वाशीम : ७.५०
यवतमाळ : ९.००
नागपूर : १२.४४
वर्धा : ९.००
भंडारा : ५.५०
गोंदिया : ७.१०
चंद्रपूर : १४.५०
गडचिरोली : ११.८९
- 1 of 1536
- ››