मराठवाड्यात तूर खरेदी १९ एप्रिलपर्यंतच

औरंगाबाद : नाफेडच्या माध्यमातून विविध केंद्रांवरून २० जानेवारीपासून किमान आधारभूत किमतीने सुरू करण्यात आलेली तूर खरेदी येत्या १९ एप्रिलपर्यंतच चालणार आहे.
tur purchase in Marathwada till April 19
tur purchase in Marathwada till April 19

औरंगाबाद : नाफेडच्या माध्यमातून विविध केंद्रांवरून २० जानेवारीपासून किमान आधारभूत किमतीने सुरू करण्यात आलेली तूर खरेदी येत्या १९ एप्रिलपर्यंतच चालणार आहे. शासनाने तूर खरेदीची मुदत निश्‍चित केली आहे. असे असले तरी बाजार सध्या अनेक जिल्ह्यात बाजार खरेदीत तुरीला सहा हजाराच्या आसपास वा काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त दर मिळत आहे. त्यामुळे सध्या तरी शासनाचे तूर खरेदी केंद्र नोंदणीपुरतेच मर्यादित असल्याचे चित्र आहे. 

प्राप्त माहितीनुसार, मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात ९, लातूर जिल्ह्यात १६, तर औरंगाबाद जिल्ह्यात ७ केंद्रे हमी दराने तूर खरेदीसाठी सुरू करण्यात आली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील ७  केंद्रात गंगापूर, औरंगाबाद, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, सोयगाव व फुलंब्री या केंद्रांचा समावेश आहे. या सात केंद्रापैकी गंगापूर, औरंगाबाद व खुलताबाद या तीनच केंद्रावर नोंदणीला प्रतिसाद मिळाला. २७१ शेतकऱ्यांनीच ऑनलाइन नोंदणी केली आहे. जालना जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या ९ केंद्रांत जालना, अंबड, तिर्थपूरी (घनसावंगी), भोकरदन, जाफराबाद, परतूर, मंठा, सातोना व तळणी या केंद्रांचा समावेश आहे. 

लातूरमध्ये ६००० ते ६२०० रुपये 

कुठे नोंदणी व कुठे प्रत्यक्ष खरेदीसाठी एसएएस पाठवून बोलावणी अशी प्रक्रिया सुरू आहे. तरीही प्रत्यक्षात या तीनही जिल्ह्यात कुठेही नाफेडची प्रत्यक्ष तूर खरेदी सुरू झाली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, लातूरच्या बाजारात तुरीला ६००० ते ६२०० रुपयांपर्यंतचे दर मिळत आहेत. इतर जिल्ह्यातही बाजारात तुरीला खरेदीसाठी मिळणाऱ्या दराची स्थिती अशीच आहे. त्यामुळे हमीदरासाठी शेतकऱ्यांनी स्वारस्य दाखविले नसल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com