दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस शेतकऱ्यांचे नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदो
बाजारभाव बातम्या
नगरमध्ये तूर ४००० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटल
नगर ः नगर येथील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या तुरीची २२५ ते ४०० क्विंटलची आवक होत आहे. तुरीला ४ हजार ते ५ हजार ५०० रुपयाचा दर मिळत आहे. अन्य भुसारची आवक मात्र अल्प आहे.
नगर ः नगर येथील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या तुरीची २२५ ते ४०० क्विंटलची आवक होत आहे. तुरीला ४ हजार ते ५ हजार ५०० रुपयाचा दर मिळत आहे. अन्य भुसारची आवक मात्र अल्प आहे.
भाजीपाल्याच्या दरात गेल्या आठवडाभरात घसरण झाली आहे. कोबी, फ्लॉवरची आवक वाढली आहे. नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात ज्वारीची दर दिवसाला २० ते २५ क्विटंलची आवक झाली आणि १७०० ते ३ हजार रुपयाचा दर मिळाला. बाजरीची सात ते दहा क्विंटलची आवक होऊन ११३१ ते १७०० रुपयाचा दर मिळाला. हरभऱ्याची दहा क्विंटलची आवक होऊन ४ हजार ४ हजार ५०० रुपयाचा दर मिळाला.
मुगाची रोज ३० ते ५० क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ७ हजार, मठाची ३ ते ५ क्विंटलची आवक होऊन ६ हजार पाचशे ते ८ हजाराचा दर मिळाला. लाल मिरचीची २० ते ३० क्विंटलची आवक होऊन ७ हजार ते १३ हजार ५०० रुपयाचा दर मिळाला. गव्हाची २० ते ३० क्विंटलची आवक होऊन १ हजार ६०० ते २ हजाराचा दर मिळाला.
सोयाबीनची ३५ ते ४० क्विंटलची आवक होऊन ३ हजार ८०० ते ४ हजार ३०० रुपयाचा दर मिळाला. मक्याची ३५ ते ४० क्विंटलची आवक होऊन १ हजार ५० ते १ हजार ८०० रुपयांचा दर मिळाला.
भाजीपाल्यात कोबी, फ्लावर, वांगी, काकडीची आवक वाढली, मात्र गेल्या आठवडाभरात दरात घसरण झाली. कोबीची ४० ते ५० क्विंटलची दररोज आवक होऊन २०० ते ५००, टोमॅटोची ७० क्विंटलची आवक होऊन ३०० ते ६००, वांग्यांची २५ ते ३० क्विंटलची आवक होऊन ८०० ते १२००, काकडीची २५ ते ३० क्विंटलची आवक होऊन ४०० ते ८००, कारल्याची २० ते ३० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजाराचा दर मिळाला.
मेथी, कोथिंबीर, पालक, चुका भाजीपाल्याचे दरही कमीच होते. हिरव्या मिरचीची ३० ते ४० क्विंटलची आवक होऊन २ हजार ५०० ते ३ हजार ५००, शेवग्याची ४ ते ५ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ५ हजार, आद्रकची १९ ते २५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते २ हजार ५०० रुपयाचा दर मिळाला.
आठवडाभराची बाजारातील स्थिती
कांदापातीची दर दिवसाला २ ते ३ क्विंटलची आवक, दर मात्र जेमतेम, मका कणसाचीही चांगली आवक, संक्रांतीच्या पाश्वभूमीवर वाल, गाजराची आवक वाढली, वाटाण्याचीही दर दिवसाला २३ ते २५ क्विंटलची आवक, घाटेहरभऱा, बिटाचीही आवक बऱ्यापैकी झाली.
- 1 of 67
- ››