तुरीला दराची फोडणी

प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने आणि नव्या हंगामातील तुरीची आवक होण्यास बराच वेळ असल्याने दरात वाढ झाली आहे.
tur
tur

अमरावती/अकोला ः प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने आणि नव्या हंगामातील तुरीची आवक होण्यास बराच वेळ असल्याने दरात वाढ झाली आहे. मंगळवारी (ता.६) धामणगावला तुरीला कमाल प्रतिक्विंटल ९२०० तर वाशीमला ९१५० रुपयांचा दर मिळाला. त्यामुळे सध्यातरी शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक स्थिती आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव बाजार समितीत तुरीला विक्रमी ९२०० रुपयांचा दर मिळाला. बाजार समितीत सोमवारी (ता.५) बाजारात ४५ ते ५० क्विंटल तुरीची आवक झाली होती. ८३०० ते ८७०० रुपये दराने या तुरीची खरेदी करण्यात आली. मंगळवारी (ता. ६) मात्र आवक वाढली असताना तुरीचे दरही वधारले. मंगळवारी ८५ ते ९० क्विंटल तुरीची आवक झाली ९००० ते ९२०० या दराने व्यापाऱ्यांनी तुरीची खरेदी केली. २०१४ मध्ये तुरीला उच्चांकी १४ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला होता. गेल्या वर्षी मात्र ५००० ते ६५०० रुपये दराने तुरीचे व्यवहार झाले.सोमवारी खामगाव बाजारपेठेत तुरीची ८२०० दराने विक्री झाली होती. त्यानंतर मंगळवारी यात सुमारे ६०० रुपयांची वाढ होऊन ८८०० रुपयांचा दर तुरीला मिळाल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. वाशीम बाजार समितीत तुरीला सोमवारी ८८०० पर्यंत भाव मिळाल्यानंतर मंगळवारी पुन्हा ३५० रुपयांची त्यात वाढ होऊन ९१५० रुपयांचा दर १५ ते १६ क्विंटल तुरीला मिळाला.    देशात तूर उत्पादनात कर्नाटक एक प्रमुख राज्य आहे. तेथे यंदा पेरणी कमी झालेली आहे. तर राज्यातील तुरीचा हंगाम आणखी दोन ते अडीच महिन्यांनी सुरू होईल. तूर बाजारात विक्रीला यायला अडीच ते तीन महिन्यांचा काळ लागू शकतो. शिवाय यंदा व्यापाऱ्यांकडेही पुरेसा स्टॉक उपलब्‍ध नाही. नाफेडने खरेदी केलेली काही तूर लॉकडाऊनच्या काळात विकली असून काही स्टॉक त्यांच्याकडेच शिल्लक आहे. बाजारपेठेत तुरीची (डाळवर्गीय धान्याचीही) मागणी वाढलेली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी आता वाढीव दराने खरेदी करीत आहे. बाजारपेठेत सध्या सुरु असलेला ट्रेंड असाच कायम राहिल्यास आगामी आठवड्यात हा दर दहा हजारांपर्यंत जाऊ शकतो, अशी शक्यताही व्यापारी सूत्रांकडून व्यक्त झाली. परंतु हे दर किती दिवस टिकतील याबाबत कुणीही शाश्‍वती द्यायला तयार सुद्धा तयार नाही. प्रतिक्रिया प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढली आहे. त्यातच आवक कमी असल्याने दरात तेजी अनुभवली जात आहे. तुरीचे दर येत्या काळात दहा हजार रुपयांचा पल्ला गाठतील.  - मनीष केला, व्यापारी, धामणगाव बाजार समिती, अमरावती  अकोल्यात दर कमीच अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला कमाल ८००० तर किमान ६५०० आणि सरासरी ७२०० रुपये दर मिळाला. कमीत कमी दर ६५०० रुपये होता. सरासरी ७२०० रुपये दरांनी तुरीची विक्री झाली. मंगळवारी १९६ क्विंटल तूर विक्रीला आली होती.

ही आहेत दरवाढीची कारणे

  • नाफेडकडून तुरीची लॉकडाऊनमध्ये मोठी विक्री
  • व्यापाऱ्यांकडेही पुरेसा स्टॉक उपलब्‍ध नाही
  • बाजारपेठेत तुरीच्या मागणीत वाढ
  • नविन तूर बाजार येण्याला दोन ते अडिच महिन्यांचा कालावधी लागणार
  • सध्या बाजारात अत्यल्प आवक सुरु
  • मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून चढ्या दराने खरेदी
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com