तुरीला दराची झळाळी

तूर उत्पादक पट्ट्यात नव्या तुरीची आवक सुरू झाली आहे. यंदा उत्पादनात १० ते ३० टक्क्यांपर्यंत घटीचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
tur
tur

नांदेड : तूर उत्पादक पट्ट्यात नव्या तुरीची आवक सुरू झाली आहे. यंदा उत्पादनात १० ते ३० टक्क्यांपर्यंत घटीचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. त्यामुळे बाजारात दर्जेदार तुरीला चांगले दर मिळत आहेत. लातूर बाजार समितीत कमाल ६२२५ रुपये, तर अकोला बाजार समितीत ६१५० रुपये दर मिळाला. नांदेड आणि जळगावध्ये ५६०० ते ५८०० रुपयाने तूर विकली गेली. पुढील काळात तूरदरात आणखी वाढ होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.  

राज्यात तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनात घट येईल, अशी शक्यता व्यक्त होत होती. यानुसार सध्या नव्या तुरीची आवक सुरू झाली आहे. आवक सर्वसाधारण असली तरी दरात मात्र तेजी आहे. नव्या तुरीला मुहूर्तावर दर साडेपाच हजारावर पोचले. मागील तीन-चार दिवसांत अकोला, नांदेड, लातूर, जालना, अकोला, जळगाव बाजार समित्यांमध्ये आवक वाढली आहे. लातूर बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. १९) तुरीची पाच हजार २० क्विंटलची आवक होती. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन हजार ७२६ क्विंटल तुरीची आवक होती. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५७६ क्विंटल तुरीची आवक होती. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची १८ क्विंटल आवक झाली होती.

प्रतिक्रिया बाजारात नव्या तुरीची आवक सुरू झाली आहे. सध्या आवक सर्वसाधारण असली, तरी मर रोगामुळे उत्पादनात वीस ते तीस टक्क्यांपर्यंत घट अपेक्षित असल्याने दरात तेजी आहे. आगामी काळात तुरीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. - चंद्रकांत शिंदे, तूर खरेदीदार नांदेड

तुरीचे दर (रुपये/क्विंटल) किमान/ कमाल ५७२५/ ६२२५ लातूर ४५००/ ६१५० अकोला  ५३००/ ५९५० जालना ५२००/ ५६५० जळगाव  ५७००/ ५८५० नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com