बाजारात तूर खातेय भाव; वाढ कायम 

इतर कडधान्य पिकांसह तूर उत्पादनातही घट झाली आहे. त्यातच व्यापारी, डाळ मिल उद्योग, साठेबाज यांनी खरेदी सुरू केल्याने तूर दर हमीभावापेक्षा १०० ते १२५० रुपायांनी अधिक आहेत.
tur
tur

पुणे ः इतर कडधान्य पिकांसह तूर उत्पादनातही घट झाली आहे. त्यातच व्यापारी, डाळ मिल उद्योग, साठेबाज यांनी खरेदी सुरू केल्याने तूर दर हमीभावापेक्षा १०० ते १२५० रुपायांनी अधिक आहेत. सध्या बाजारात गुणवत्तेप्रमाणे ६१०० ते ७२५० रुपये दर मिळत आहेत. पुढील एक ते दीड महिने ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज असून, शेतकऱ्यांनी बाजाराची माहिती घेऊन टप्प्याटप्प्याने विक्री करावी, असे आवाहन बाजारातील जाणकारांनी केले आहे. 

बाजाराचा अंदाज घेऊन विक्री करावी  यंदा सरकारने तुरीसाठी ६००० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र सध्या बाजारात तूर हमीभावापेक्षा १०० ते १००० रुपये अधिक दराने विकली जात आहे. राज्यातील बाजारात ६१०० ते ७२५० रुपये दर मिळत आहे. तर कर्नाटकात ५५०० ते ७२५० रुपये आहेत. सरासरी दर हे ६५०० रुपये आहेत. एकूण उत्पादनातील घट आणि वाढती मागणी यामुळे दरातवाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा अंदाज घेऊन विक्री करावी. दरातील थोड्याफार घसरणीने पॅनिक सेल करून नये, असे आवाहन जाणकारांनी केले आहे. 

स्थिर उत्पादनाच्या अंदाजानंतरही दरवाढ  केंद्र सरकारने नुकतेच देशातील अन्नधान्य उत्पादनाचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार यंदा तूर उत्पादन ३.८८ दशलक्ष टन राहील असे म्हटले आहे. मागील वर्षी ३.८९ दशलक्ष टन उत्पादन होते. यंदा किंचित घट होईल, असे जाहीर केले आहे. मात्र बाजारात तुरीचे दर स्थिरावण्याऐवजी वाढतच आहेत. व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील उत्पादन सरकारच्या आकड्यापेक्षाही कमी राहील. याचा अंदाज असल्यानेच व्यापारी आणि मोठ्या कंपन्या खरेदीत उतरल्या आहेत. त्यातच गेल्या वर्षीचा शिल्लक साठा नाही. परिणामी, तुरीचे दर वाढलेले आहेत. 

खरेदी वाढल्याने तेजी ः गोयंका  अकोला येथील ग्रेन असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश गोयंका म्हणाले, की अकोला बाजारात दैनंदिन चार ते पाच हजार कट्ट्यांची आवक होत आहे. बाजारात सध्या ६६०० ते ७१०० रुपयांच्या दरम्यान दर आहेत. दरात १०० ते २०० रुपये चढउतार होत आहेत. यंदा उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटी माल कमी पडेल म्हणून सध्या सर्वच पातळ्यांवर खरेदी सुरू झाली आहे. डाळ कंपन्यांनीही खरेदी सुरू केली. व्यापारीही सौद्यात उतरले आहेत. विशेष म्हणेज दिल्ली येथील मोठे व्यापारीही सध्या खरेदी करत आहेत. बाजारातील तेजी पाहून शेतकरीही माल राखून ठेवत आहेत. त्यातच यंदा उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरात तेजी अनुभवायला येत आहे. यंदा मागील वर्षाचा शिल्लक साठा नाही. त्यातच खेरदी वाढल्याने दर तेजीत आहेत. याचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे सरकारने तूर आयातीची घाई करून नये. मोठ्या कंपन्या दरात तेजी-मंदी आणू शकतात. परंतु यंदा शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल, असा अंदाज आहे. 

तुरीला खेरदीचा आधार ः चौहान  ‘‘महाराष्ट्रात काही ठिकाणी कोरोनामुळे बाजार समित्या बंद केल्या आहेत. त्याचा काही प्रमाणात परिणाम बाजारावर होईल. मात्र तुरीचे दर हे पडण्याची शक्यता कमीच आहे. देशात एकूणच उत्पादनात घट झाली आहे. वातावरणाचा पिकावर परिणाम झाल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात फटका बसला. दोन्ही महत्त्वाच्या तूर उत्पादक राज्यांत तुरीचा दाणा छोटा आला आहे. त्यामुळे प्रक्रियेत उतारा कमी येतो. सध्या डाळ मिल उद्योगांनी खरेदी केली आहे. त्यातच नव्या कृषी कायद्यांमुळे साठवणुकीची परवानगी मिळाल्याने व्यापारी साठा करत आहेत. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. परिणामी, यंदा तूर आयात होण्याची शक्यता आहे. आपण म्यानमार आणि आफ्रिकन देशांतून तूर आयात करतो. मात्र म्यानमारमध्येही यंदा तूर पीक कमीच आहे. भारत सरकारने आफ्रिकेतील काही देशांकडून तूर आयातीचा करार केला आहे. मात्र येथील टंझानिया, मोझांबिक आणि मालावी देशांतच उत्पादन कमी असते. मात्र येथील व्यापारी इतर देशांतून तूर विकत घेऊन भारतात पाठवितात. म्हणजेच भारत सरकारच्या निर्णयाचा लाभ येथील शेतकऱ्यांनाही होताना दिसत नाही,’’ असे नवी दिल्ली येथील आयग्रेन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राहुल चौहान यांनी सांगितले.  जाणकारांच्या मते 

  • आफ्रिकेतील देशांकडे तुरीचा कमी साठा 
  • भारताला निर्यात करण्यासाठी तूरच नाही 
  • भारताने आयात कोटा जाहीर केल्यानंतर या देशांनी जवळपास सर्व तूर निर्यात केली 
  • जाणकारांच्या मते येथील तूर सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये बाजारात येण्याची शक्यता 
  • प्रतिक्रिया बाजारात तुरीचे दर वाढले असले, तरी यंदाच्या हंगामात सहकारने अद्यापही तूर आयातीला परवानगी दिलेली नाही. गेल्या वर्षी सरकारने तीन लाख टन तूर आयातीचा कोटा दिला होता. त्याप्रमाणे आयात झाली होती. आपल्याकडे बर्मासह आफ्रिकन देशांकडून आयात होत असते. सरकारने परवानगी दिल्यानंतर आयात होईल.  - जीतू भेडा, तूर आयातदार 

    देशातील तूर उत्पादन (दशलक्ष टनांत)  वर्ष ः उ त्पादन  २०१५-१६ः २.५६  २०१६-१७ः ४.८७  २०१७-१८ः ४.२९  २०१८-१९ः ​ ३.३२  २०१९-२०ः ३.८९  २०२-२१*ः ​ ३.८८  (स्रोत ः कृषी मंत्रालय)  (* दुसरा दुधारित अंदाज) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com