agriculture news in Marathi tur rate may impact by import Maharashtra | Page 5 ||| Agrowon

आयातीने तुरीच्या दरावर परिणाम शक्य 

टीम अॅग्रोवन
रविवार, 21 मार्च 2021

उडीद आयातीला गेल्या आठवड्यात परवानगी दिल्यानंतर केंद्र सरकारने शुक्रवारी (ता. १९) चार लाख टन तूर आणि दीड लाख टन मूग आयातीला परवानगी दिली आहे. 

पुणे ः उडीद आयातीला गेल्या आठवड्यात परवानगी दिल्यानंतर केंद्र सरकारने शुक्रवारी (ता. १९) चार लाख टन तूर आणि दीड लाख टन मूग आयातीला परवानगी दिली आहे. सरकार कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याच्या गप्पा करते आणि दुसरीकडे आयात करून दर पाडते. या दुटप्पी धोरणामुळे सरकारचे उद्दिष्ट कदापि साध्य होणार नाही, अशी टीका जाणकरांनी केली. 

केंद्र सरकारने मागील आठवड्यात चार लाख टर उडीद आयातीला परवानगी दिली. बाजारात तुरीचे दर सहा हजारांपार गेल्यानंतर डाळींच्या दरातही वाढ झाली. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी चार लाख टन तूर आयातीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र पिकाचे अतोनात नुकसान होऊन उत्पादन घटल्यानंतर दरात वाढ झाली, त्यामुळे शेतकऱ्यांना दरवाढीनंतरही पीक आतबट्याचेच ठरले. सरकारने दीड लाख टन मूग आयातीलाही परवानगी दिली आहे. 

प्रतिक्रिया
आयातीने नेहमीच शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. आयात करताना संबंधित शेतीमालाचे दर हमीभावाच्या खाली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतमाल खरेदीची व्यवस्था नसताना हमीभावाच्या खाली शेतकऱ्यांचा माल खरेदी करून आयात केली जात असेल तर त्याचा शेतकरी संघटना निषेधच करेल. 
- अनिल घटवट, अध्यक्ष, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना 

बाजारात सध्या शेतकऱ्यांची तूर येत आहे, हे पाहून आम्ही सरकारकडे तूर आयातीचा कोटा नंतर देण्याची मागणी केली होती. मात्र बाजारातील वाढते दर पाहून सरकारने आयातीला परवानगी दिली आहे. मागणीप्रमाणे सरकारने व्यापाऱ्यांना आयात करण्याची परवानगी दिली आहे. 
- सुनील बलदेवा, कडधान्य व्यापारी, दिल्ली 


इतर अॅग्रोमनी
साखर निर्यातीचा ‘गोडवा’ वाढलाकोल्हापूर : केंद्राकडून साखर निर्यात धोरण जाहीर...
पाम तेल आयातीवर श्रीलंकेचा ‘सर्जिकल...कोलंबो : श्रीलंका सरकारने पाम तेलाच्या आयातीवर...
सोयाबीनची तेजी अबाधित पुणे ः यंदा सोयाबीच्या दरांमध्ये झालेली सुधारणा...
भारताकडून पिवळ्या वाटाण्याची आयात बंद पुणे ः युक्रेनमधून पिवळ्या वाटाण्याची आयात करणारा...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः यंदाचा बेदाणानिर्मितीचा हंगाम अंतिम...
हरभरा दरवाढीचे संकेतपुणे ः देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक...
कापूस लागवडीत यंदा घट शक्यपुणे ः पुढील दोन ते तीन महिन्यांत खरीप लागवड सुरू...
भारताने आयात-निर्यात धोरणांत बदल करू नयेपुणे ः केंद्र सरकारकडून आयात-निर्यातीच्या...
ब्राझीलच्या साखरेचा आंतरराष्ट्रीय...कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत...
खाद्य तेलाच्या किमती आटोक्यात आणणार :...नवी दिल्ली : देशातील खाद्य तेलाच्या किरकोळ...
अन्नप्रक्रिया उद्योगासाठी १०,९००...नवी दिल्ली : देशातील अन्नप्रक्रिया उद्योगासाठी (...
सांगली बाजारात हळदीचे दर स्थिर सांगली ः गेल्या आठवड्यापासून हळदीचे दर स्थिर असून...
चीनच्या मागणीने शेंगदाणा दराला आधार पुणे : शेंगदाण्याची बाजारात गेल्या वर्षीच्या...
राज्यात शिल्लक साखरेचा बोजा कायम कोल्हापूर : यंदाचा साखर हंगाम अंतिम टप्प्यात येत...
लातूरला सोयाबीनचा भाव साडे पाच हजारावरलातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
हळदीच्या आवकेत वाढसांगली ः हळदीचा हंगाम सुरु झाल्यापासून सहा ते...
तूर आयातीचा परिणाम दीर्घकाळ कमीच राहील पुणे ः सरकारने वित्तीय वर्ष २०२१-२२ साठी ६ लाख टन...
राज्यातून २० लाख टन साखरनिर्यातीचे करार कोल्हापूर ः यंदा साखर उत्पादनाबरोबरच...
आयातीने तुरीच्या दरावर परिणाम शक्य पुणे ः उडीद आयातीला गेल्या आठवड्यात परवानगी...
आवक वाढूनही हरभरा दर टिकून पुणे ः यंदा हरभरा उत्पादनात घटीचा अंदाज आणि सण...