agriculture news in Marathi tur rate stable in APMCs Maharashtra | Page 3 ||| Agrowon

बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर स्थिरावले 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 मे 2021

यंदा तुरीचे उत्पादन कमी झाले. शिवाय तुरीची मागणी वाढल्याने सुरुवातीला दरही चांगले मिळत होते. मात्र गेल्या काही दिवसांत तुरीचे दर स्थिरावल्यासारखे दिसत आहे. सध्या तुरीचा भाव सरासरी साडेसहा हजारांदरम्यान टिकून आहे.

अकोला ः यंदा तुरीचे उत्पादन कमी झाले. शिवाय तुरीची मागणी वाढल्याने सुरुवातीला दरही चांगले मिळत होते. मात्र गेल्या काही दिवसांत तुरीचे दर स्थिरावल्यासारखे दिसत आहे. सध्या तुरीचा भाव सरासरी साडेसहा हजारांदरम्यान टिकून आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाउनचा परिणाम बाजारावर मोठ्या प्रमाणात होत आहे. काही बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद तर काही ठिकाणी अर्धा दिवस सुरू, अशा प्रकारे व्यवहारांची स्थिती आहे. 

पश्‍चिम विदर्भात अकोल्याची बाजारपेठ तुरीच्या दर व आवकेसाठी महत्त्वाची आहे. २५ एप्रिलपासून या बाजार समितीत तुरीच्या दरांचा ट्रेंड बघितला असता २६ व २८ एप्रिलला सरासरी दर ६८०० पर्यंत मिळाला. कमीत कमी ६२०० व जास्तीत जास्त ७००० रुपये दर याकाळात होता. नंतर मात्र, दरांमध्ये थोडीफार घसरण होत गेली. मंगळवारी (ता. ४) तूर ६६५० रुपये क्विंटल विकल्या गेली. या भागातील इतर बाजार समित्यांमध्ये जवळपास असाच दर मिळाला. गेल्या १५ ते २० दिवसांपासून कोराना निर्बंधामुळे बाजार समित्यांमध्ये दरांवर परिणाम दिसून येत आहे. यामुळे दरात १५० ते २०० रुपये तूर पाहायला मिळत आहे. 

आगामी हंगाम लक्षात घेता तुरीची आवक बऱ्यापैकी सुरू आहे. अकोल्यात सहाशे पोत्यांवर आवक झाली होती. तर वाशीम बाजारात ३११२ पोत्यांची आवक होती. दर या बाजार समितीत तुरीचा दर ६३०० ते ६८०० रुपये मिळाला. बाजार समित्यांमध्ये कोरोनाचे निर्बंध पाळत व्यवहार सुरू ठेवण्यावर प्रशासन जोर देत आहेत. मात्र त्यांनाही अनेक अडथळे येत आहेत. 

परिस्थिती सुधारल्यास लाभ 
मागणी कमी झाल्याने तसेच लॉकडाउन निर्बंधांमुळे तुरीच्या दरात तूट आलेली आहे. येणाऱ्या काळात हे दर कधी तेजीत येतील हे सध्या सांगता येणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे होते. कोरोनाचे निर्बंध सैल झाल्यानंतर काय परिस्थिती राहते त्यावर कदाचित पुढील अंदाज देता येणे शक्य होईल, अशा स्वरूपाच्या सावध प्रतिक्रिया बाजारात मिळाल्या. 

प्रतिक्रिया 
खामगाव (जि. बुलडाणा) बाजारात तुरीला दर ६२०० ते ६७०० पर्यंत मिळत आहे. गेल्या काही दिवसांचा विचार केला तर हे दर खाली आलेले आहेत. तुरीला सध्या उठाव नाही. लॉकडाउन असल्याने लग्न समारंभ, मोठे कार्यक्रम बंद आहेत. तसेच आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे तुरीचा उठाव नाही. कालपेक्षा आजच्या बाजारात १०० रुपयांनी भाव खाली आहे. 
- अविनाश सोनटक्के, अडत दुकानदार, खामगाव, जि. बुलडाणा 


इतर बातम्या
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
पीक विम्यात चुकीचे प्रकार खपवून घेणार ...नाशिक: पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
केंद्राच्या काळ्या कायद्यांची आम्हाला...नवी दिल्ली ः कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या...
धरण क्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात...
राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...
हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...
कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...
राज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...
रत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड ...रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून पूर...
विदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे...नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता...
मराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम, मोठ्या...
स्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत...आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणूस बथ्थड, मूर्ख होत...
कोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटकाकोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे सुमारे...