परभणी, हिंगोली जिल्ह्यात तूर नोंदणीसाठी मोठा प्रतिसाद

हंगामात तूर विक्रीसाठी शुक्रवार (ता. ८) पर्यंत परभणी जिल्ह्यातील १ हजार २० आणि हिंगोली जिल्ह्यात १ हजार ६६४ शेतकऱ्यांनी असे दोन जिल्ह्यांतील मिळून २ हजार ६६४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
परभणी, हिंगोली जिल्ह्यात तूर नोंदणीसाठी मोठा प्रतिसाद
परभणी, हिंगोली जिल्ह्यात तूर नोंदणीसाठी मोठा प्रतिसाद

परभणी, हिंगोली ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत यंदाच्या (२०२०-२१) हंगामात तूर विक्रीसाठी शुक्रवार (ता. ८) पर्यंत परभणी जिल्ह्यातील १ हजार २० आणि हिंगोली जिल्ह्यात १ हजार ६६४ शेतकऱ्यांनी असे दोन जिल्ह्यांतील मिळून २ हजार ६६४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यातील ७ ठिकाणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ६ ठिकाणी तर विदर्भ सहकारी पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यातील २ ठिकाणी असे दोन जिल्ह्यात एकूण १५ शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यात परभणी येथे तालुका खरेदी विक्री संघ मर्या. नवा मोंढा असून केंद्रचालक माणिक निलवर्ण (मो. ९९६००९३७९६)हे आहेत. जिंतूर येथे तालुका जिनिंग प्रेसिंग सहकारी सोसायटी मर्यादित, सिद्धेश्वर हायस्कूल जवळ, केंद्रचालक नंदकुमार महाजन (मो.  ९४०५४७३९९९). पूर्णा येथे तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, समर्थ मार्केट, केंद्रचालक संदीप घाटोळ (मो. ९३५९३३३४१३), पाथरी येथे स्वस्तिक सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मार्केट यार्ड, केंद्रचालक अनंत गोलाईत (मो. ९९६०५७००४२), सोनपेठ येथे स्वप्नभुमी सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मार्केट कमिटी कॉम्प्लेक्स, केंद्रचालक श्रीनिवास राठोड (मो. ९०९६६९९६९७), बोरी (ता. जिंतूर) येथे तुळजाभवानी कृषी विकास सेवा सहकारी संस्था मर्यादित बोर्डीकर कॉम्पलेक्स, केंद्रचालक गणेश नांदेडकर (मो. ८८०६०२८०८२), सेलू येथे तुळजाभवानी विकास सेवा सहकारी संस्था मर्यादित मार्केट यार्ड, केंद्रचालक संतोष शिंदे (मो. ९८६०२५१३२७) नोंदणी सुरू आहे. हिंगोली येथे प्रगती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, जुने जिल्हा रुग्णालयाच्या समोर, तोफखाना, केंद्रचालक अमोल काकडे( मो. ८७८८४८७५८०), कळमनुरी येथे कयाधू शेतकरी उत्पादक कं. मर्या. तोंडापूर, वारंगा फाटा (ता. कळमनुरी) केंद्रचालक महेंद्र माने (मो. ९७३६४४९३८३), जवळा बाजार (ता. औंढा नागनाथ) येथे तालुका सहकार खरेदी विक्री संघ मर्या. जवळा बाजार केंद्रचालक कृष्णा हरणे (मो. ९१७५५८६७५८), वसमत येथे तालुका सह. खरेदी विक्री संघ मर्या. वसमत केंद्रचालक सागर इंगोले (मो. ८३९०९९५२९४) सेनगांव येथे श्री. संत भगवानबाबा स्वयंरोजगार सेवा संस्था कोथळज, साई ॲग्रो इंडस्ट्रीज जिनिंग फॅक्ट्री, हिंगोली रोड सेनगांव, केंद्रचालक संदीप काकडे  (मो. ९८२३२५२७०७),) साखरा (ता. सेनगाव) येथे विजयालक्ष्मी बेरोजगार सह. संस्था मर्या कोळसा केंद्रचालक उमाशंकर माळोदे (मो. ९६५७२६०७४३) या केंद्रांवर शेतकऱ्यांना तूर विक्री नोंदणी सुरू झाली आहे, असे जिल्हा पणन अधिकारी के. जे. शेवाळे यांनी सांगितले. विदर्भ सहकारी पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यातील मानवत आणि गंगाखेड येथे तूर विक्रीसाठी शेतकरी नोंदणी सुरू झाली आहे.मानवत येथील केंद्रांवर एकूण १ हजार ६२५ शेतकऱ्यांचे अर्ज आले असून त्यापैकी २४५ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. गंगाखेड येथील केंद्रावर १ हजार ८०० वर शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे. परंतु महसूल विभागातर्फे सात बारांचे अद्यायवतीकरण केले नसल्यामुळे ऑनलाइन नोंदणी करता येत नाही. केंद्रनिहाय नोंदणी स्थिती ( तालुका : शेतकरी संख्या)  परभणी : २३४, जिंतूर : ४६, बोरी : २८२, सेलू : ००, मानवत :२४५, पाथरी : १८५, सोनपेठ : २७, गंगाखेड : ००, पूर्णा : १, हिंगोली : २४८, कळमनुरी : १६६, वसमत :  १४५, जवळा बाजार : १०४३, सेनगाव : ६२, साखरा : ००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com