अकोला, वाशीम जिल्ह्यांत तूर, हरभरा खरेदी नावापुरतीच
अकोला, वाशीम जिल्ह्यांत तूर, हरभरा खरेदी नावापुरतीच

अकोला, वाशीम जिल्ह्यांत तूर, हरभरा खरेदी नावापुरतीच

अकोला  : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने अकोला व वाशीम जिल्ह्यात सुरू केलेल्या तूर, हरभरा खरेदीला आतापर्यंत अल्प असा प्रतिसाद मिळाला आहे. अकोल्यात तूर खरेदी चांगली असली तरी हरभरा खरेदी मात्र नावापुरतीच झालेली आहे. वाशीम जिल्ह्यात तर केवळ वाशीम केंद्र सुरू असून तेथे ९१ क्विंटल हरभरा खरेदी झाली. उर्वरित केंद्रावर एक दाणासुद्धा खरेदी केला गेलेला नाही.  शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी आधारभूत किमतीने शासनाकडून खरेदी केली जाते. यावर्षी खरेदीपूर्वी शेतकऱ्यांना ऑनलाइन नावनोंदणी करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली. तूर, हरभरा खरेदीचा आढावा घेतला असता अकोला जिल्ह्यात तेल्हारा, वाडेगाव, पातूर आणि पारस या ठिकाणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची तूर खरेदी सुरू आहे. या चार केंद्रांवर ८६२० शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली असताना आतापर्यंत २२८४ शेतकऱ्यांची ३५ हजार ६३५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.  तर हरभरा विक्रीसाठी ४७८२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून आतापर्यंत केवळ १७ शेतकऱ्यांचा २६६ क्विंटल हरभरा खरेदी झाला. हा हरभरा तेल्हारा केंद्रावर खरेदी झाला असून वाडेगाव, पातूर, पारस या ठिकाणी अद्याप एक क्विंटलही खरेदी झालेली नाही. वाशीम जिल्ह्यात वाशीम, अनसिंग, मालेगाव व रिसोड या ठिकाणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची केंद्रे आहेत. यापैकी मालेगाव येथे सर्वाधिक ४०५६ तूर उत्पादकांची नोंदणी झाली. यापैकी मालेगाव केंद्रावर ३१९ क्विंटल तूर खरेदी झाली. रिसोडमध्ये २२३ आणि वाशीममध्ये ४३ क्विंटल असे मिळून ५८५ क्विंटर तुरीची खरेदी झाली. तर हरभऱ्याची केवळ वाशीम केंद्रावर १५ शेतकऱ्यांची ९१ क्विंटल खरेदी झालेली आहे. उर्वरित केंद्रावर एक दाणाही खरेदी झालेला नाही. अकोला जिल्हा पीक : तूर

  •  ऑनलाइन नोंदणी ८६२०
  •  खरेदी ३५६३५
  •  शेतकरी २२८४  
  • पीक : हरभरा 

  •  ऑनलाइन नोंदणी ४७८२  
  •  खरेदी २६६ क्विंटल
  •  शेतकरी १७
  • वाशीम जिल्हा पीक : तूर

  •  ऑनलाइन नोंदणी -४५८२
  •  खरेदी - ५८५ क्विंटल
  •  ऑनलाइन नोंदणी-४०८
  •  खरेदी ९१ क्विंटल 
  •  शेतकरी १५
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com