agriculture news in marathi, Tur repurchase in Akola, Washim | Page 2 ||| Agrowon

अकोला, वाशीम जिल्ह्यांत तूर, हरभरा खरेदी नावापुरतीच
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 एप्रिल 2019

अकोला  : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने अकोला व वाशीम जिल्ह्यात सुरू केलेल्या तूर, हरभरा खरेदीला आतापर्यंत अल्प असा प्रतिसाद मिळाला आहे. अकोल्यात तूर खरेदी चांगली असली तरी हरभरा खरेदी मात्र नावापुरतीच झालेली आहे. वाशीम जिल्ह्यात तर केवळ वाशीम केंद्र सुरू असून तेथे ९१ क्विंटल हरभरा खरेदी झाली. उर्वरित केंद्रावर एक दाणासुद्धा खरेदी केला गेलेला नाही. 

अकोला  : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने अकोला व वाशीम जिल्ह्यात सुरू केलेल्या तूर, हरभरा खरेदीला आतापर्यंत अल्प असा प्रतिसाद मिळाला आहे. अकोल्यात तूर खरेदी चांगली असली तरी हरभरा खरेदी मात्र नावापुरतीच झालेली आहे. वाशीम जिल्ह्यात तर केवळ वाशीम केंद्र सुरू असून तेथे ९१ क्विंटल हरभरा खरेदी झाली. उर्वरित केंद्रावर एक दाणासुद्धा खरेदी केला गेलेला नाही. 

शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी आधारभूत किमतीने शासनाकडून खरेदी केली जाते. यावर्षी खरेदीपूर्वी शेतकऱ्यांना ऑनलाइन नावनोंदणी करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली. तूर, हरभरा खरेदीचा आढावा घेतला असता अकोला जिल्ह्यात तेल्हारा, वाडेगाव, पातूर आणि पारस या ठिकाणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची तूर खरेदी सुरू आहे. या चार केंद्रांवर ८६२० शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली असताना आतापर्यंत २२८४ शेतकऱ्यांची ३५ हजार ६३५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. 

तर हरभरा विक्रीसाठी ४७८२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून आतापर्यंत केवळ १७ शेतकऱ्यांचा २६६ क्विंटल हरभरा खरेदी झाला. हा हरभरा तेल्हारा केंद्रावर खरेदी झाला असून वाडेगाव, पातूर, पारस या ठिकाणी अद्याप एक क्विंटलही खरेदी झालेली नाही.

वाशीम जिल्ह्यात वाशीम, अनसिंग, मालेगाव व रिसोड या ठिकाणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची केंद्रे आहेत. यापैकी मालेगाव येथे सर्वाधिक ४०५६ तूर उत्पादकांची नोंदणी झाली. यापैकी मालेगाव केंद्रावर ३१९ क्विंटल तूर खरेदी झाली. रिसोडमध्ये २२३ आणि वाशीममध्ये ४३ क्विंटल असे मिळून ५८५ क्विंटर तुरीची खरेदी झाली. तर हरभऱ्याची केवळ वाशीम केंद्रावर १५ शेतकऱ्यांची ९१ क्विंटल खरेदी झालेली आहे. उर्वरित केंद्रावर एक दाणाही खरेदी झालेला नाही.

अकोला जिल्हा
पीक : तूर

  •  ऑनलाइन नोंदणी ८६२०
  •  खरेदी ३५६३५
  •  शेतकरी २२८४  

पीक : हरभरा 

  •  ऑनलाइन नोंदणी ४७८२  
  •  खरेदी २६६ क्विंटल
  •  शेतकरी १७

वाशीम जिल्हा
पीक : तूर

  •  ऑनलाइन नोंदणी -४५८२
  •  खरेदी - ५८५ क्विंटल

पीक : हरभरा 

  •  ऑनलाइन नोंदणी-४०८
  •  खरेदी ९१ क्विंटल 
  •  शेतकरी १५

इतर ताज्या घडामोडी
सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या...अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य...
सातारा जिल्ह्यातील चार साखर...सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची...
‘आदिनाथ'च्या कामगारांचे पगारासाठी ‘...सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने...
उजनी कालवा फुटला, पिके उद्‌ध्वस्तमोहोळ, जि. सोलापूर : उजनी धरणाचा डावा कालवा मोहोळ...
आधुनिक तंत्रांचा वापर करून स्मार्ट शेती...अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि...
सांगली जिल्ह्यात अजूनही ९१ टॅंकर सुरूचसांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच...
सिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर...सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी...
पुणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदानपुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी...
अखेर बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो’धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि...
'स्मार्ट' मुख्यालयाला मिळाली नवी जागापुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या...
सोलापूर जिल्ह्यात मका लष्करी अळीने केला...सोलापूर ः दुष्काळातही जेमतेम पाण्यावर यंदा...
तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पुणे ः उत्तर, दक्षिण महाराष्ट्रात कमी दाबाचे...
अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यांत अतिवृष्टीअकोला ः मागील २४ तासांत अकोला जिल्ह्यात दमदार...
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...
कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...
औरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...