देशात तुरीची ४५ लाख हेक्टरवर लागवड

तूर
तूर

नवी दिल्ली:  देशात खरिपाची लागवड पूर्ण झाली आहे. यंदा कडधान्य पेरणीत दोन टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. मात्र कडधान्यांमध्ये महत्त्वाचे पीक असलेल्या तुरीच्या लागवडीत किंचित वाढ झाली आहे. यंदा देशात तुरीची ४५.८ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून मिळाली.   देशातील महत्त्वाच्या तूर उत्पादक राज्यांमध्ये यंदा मॉन्सूनचे उशिरा आगमन झाल्याने खरीप पेरण्या खोळंबल्या होत्या. पेरणीयोग्य पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी वाट पाहणेच पसंत केले. जुलै महिन्याच्या मध्यानंतर पावसाला सुरवात झाली. मात्र, त्या वेळीही सार्वत्रिक पाऊस नव्हता. पेरणीयोग्य पाऊस झाला त्या वेळी लागवडीची वेळ निघून गेली होती. त्यामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात यंदा तूर लागवड कमी झाली आहे. महाराष्ट्रात तूर लागवड २.२ टक्क्यंनी घटून १२.१ लाख हेक्टरवर झाली. तर मध्य प्रदेशात तूर लागवड तब्बल १९ टक्क्यांनी घटली येथे यंदा केवळ पाच लाख ६ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे.  मात्र, इतर राज्यांमध्ये चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी तूर लागवड वाढविली, त्यामुळे सरासरी ४२.३ लाख हेक्टरपेक्षा अधिक लागवड झाली आहे. यंदा देशात तुरीची ४५.८ लाख हेक्टरवर लागवड झाली. कर्नाटकात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत तूर लागवडीत २० टक्क्यांनी वाढ झाली असून, ११.९ लाख हेक्टरवर तूर पीक आहे.  यंदा तूर लागवडीत घट वाढ झाली असली तरीही केंद्र सरकारने देशात तूर उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत घटण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी देशात ३६ लाख टन तूर उत्पादन झाले होते. २०१९-२० या वर्षात ३५ लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे.  मध्य प्रदेशात लागवड १९ टक्क्यांनी घटली देशात मध्य प्रेदश आणि महाराष्ट्र ही आघाडीची तूर उत्पादक राज्ये आहेत. मात्र पावसाअभावी या राज्यांमध्ये तूर लागवड यंदा कमी झाली आहे. मॉन्सूनचे उशिरा झालेले आगमन आणि पावसातील मोठी तूट यामुळे लागवड कमी झाली. प्रारंभी पेरणीयोग्य पाऊस नाही आणि पाऊस आला तेव्हा लागवडीची वेळ निघून गेली. यामुळे दोन्ही राज्यांत क्षेत्र घटले. महाराष्ट्रात लागवड २.२ टक्क्यंनी घटून १२.१ लाख हेक्टरवर झाली. तर मध्य प्रदेशात तूर लागवड तब्बल १९ टक्क्यांनी घटली. येथे यंदा केवळ पाच लाख ६ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे.  राज्यनिहाय तूर लागवड (हेक्टरमध्ये)

राज्य   २०१९-२० २०१८-१९  बदल (टक्के)
आंध्र प्रदेश  २,२७,०००  २,२०,०००  ३.२
छत्तीसगड   १,२७,५०० १,२९,२०० (-१.३) 
गुजरात  २,१०,३०० २,५५,३००    (-१७.६) 
झारखंड  २,२९,५००     २,२७,८००   ०.७  
कर्नाटक  ११,९३,६००  ९,९२,०००      २०.३ 
मध्य प्रदेश     ५,०६,०००   ६,२५,०००   (-१९) 
महाराष्ट्र   १२,०७,५००   १२,३४,३००       (-२.२)
ओडिशा १,२८,८०० १,४३,२००  (-१०.१)  
तेलंगणा  २,८६,७०० २,७७,७००  ३.२
उत्तर प्रदेश  ३,५१,००० ३,४६,५०० १.३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com