रावेरमध्ये नाफेडमार्फत तूर खरेदीला सुरुवात

रावेरमध्ये नाफेडमार्फत तूर खरेदीला सुरुवात
रावेरमध्ये नाफेडमार्फत तूर खरेदीला सुरुवात

रावेर, जि.जळगाव  : रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून प्रत्यक्षात नाफेडमार्फत तूर खरेदीला मंगळवारपासून (ता. ३) प्रारंभ झाला. शासनाने प्रतिक्विंटल पाच हजार आठशेचा भाव निश्चित केला असून आत्तापर्यंत ९४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. रावेर शहरातील आठवडे बाजार समितीच्या आवारात खरेदी विक्री संघातर्फे तूर खरेदी केंद्राला सुरुवात झाली. खरेदी-विक्री संघाचे चेअरमन पी. आर. पाटील, बाजार व समिती सभापती श्रीकांत महाजन यांच्या हस्ते खरेदीची सुरुवात झाली. शासनाकडून प्रतिक्विंटल पाच हजार आठशेचा भाव निश्चित करण्यात आला असून प्रत्येक शेतकऱ्यांकडून प्रत्येक हेक्टरी सहा क्विंटल ६४ किलो तूर खरेदी केली जाणार असून जास्तीत जास्त एका शेतकऱ्यांकडून २५ क्विंटल तूर खरेदी केली जाणार आहे. प्रसंगी डीएमओ परिमल साळुंखे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन पी. आर. पाटील, व्हा. चेअरमन चौधरी, बी. एम. पाटील, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, संचालक नीलेश चौधरी, बाजार समिती संचालक पितांबर पाटील, संचालक लक्ष्मण मोपारी, अशोक चौधरी, शेतकरी भगवान चौधरी, खरेदी-विक्री संघ मॅनेजर विनोद चौधरी, ग्रेडर प्रशांत पाटील, सुनील महाजन आदी शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com