बुलडाण्यात तूर, हरभऱ्याचे चुकारे थकल्याने शेतकरी अडचणीत

बुलडाण्यात तूर, हरभऱ्याचे चुकारे  थकल्याने शेतकरी अडचणीत
बुलडाण्यात तूर, हरभऱ्याचे चुकारे थकल्याने शेतकरी अडचणीत

बुलडाणा : शासनाने हमीभावाने खरेदी केलेल्या तूर व हरभऱ्याचे सुमारे ४४ कोटींपेक्षा अधिक रुपयांचे चुकारे थकलेले असून शेतकऱ्यांना तातडीने पैसे मिळावेत, अशी मागणी सर्वत्र होत अाहे. तूर अाणि हरभरा उत्पादकांच्या रखडलेल्या चुकाऱ्यांची रक्कम नाफेडच्या वतीने देण्याची प्रक्रिया राबवली जात असल्याचा दिलासाच केवळ अधिकाऱ्यांकडून मिळत अाहे.

या हंगामात अाॅनलाईन नोंदणी झालेली तूर व हरभऱ्याची सरासरी २५ टक्केही खरेदी शासनाकडून झालेली नाही. ठेवायला जागा, बारदाना नसणे अादी कारणाने अत्यंत संथगतीने ही मोजणी प्रक्रिया राबवल्याने ७५ टक्के शेतकरी अापला माल हमीभावाने विकू शकलेले नाहीत. असे असताना ज्यांनी शासनाला तूर व हरभरा विकला त्यांचेही पैसे मिळायला मोठा विलंब होत अाहे. जिल्ह्यात अद्यापही सुमारे ४४ कोटींपेक्षा अधिक रक्कम अदा करायची शिल्लक अाहे. याबाबत ठोस कारवाई होण्याची मागणी शेतकरी करीत अाहेत. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत हे रखडलेले चुकारे तातडीने देण्याबाबत निवेदन दिले. शासनाने दखल न घेतल्यास अांदोलनाचा इशारा दिला अाहे.      

हजार रुपयांची मदतही रखडलेलीच अाॅनलाईन नोंदणी करणाऱ्या व मोजमाप न झालेल्या शेतकऱ्यांच्या तूर व हरभऱ्याला प्रतीक्विंटल एक रुपये अार्थिक मदत देण्याचे शासनाने जाहीर केले अाहे. ही मदत मिळण्यासाठी मोठ्या कसरती सुरू झाल्या अाहेत. नोंदणी केली पण मोजमाप झाले नाही, अशा शेतकऱ्यांची यादी खरेदी विक्री संघामार्फत तहसीलदारांकडे पाठविण्यात अाली आहे. या याद्या पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तपासणी केल्या जात अाहेत. एक हेक्टर क्षेत्र व दहा क्विंटल मर्यादेत शासन मदत करणार असल्याचे सांगितले जात अाहे. दोनवर्षांपूर्वी सोयाबीन अनुदानाबाबत शासनाकडून अशीच याद्यांची छानणी करण्यात अाली होती. तोच कित्ता पुन्हा तूर व हरभरा उत्पादकांना मदत देण्यासाठी गिरवला जात अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com