नवी दिल्ली : नाशिकमध्ये २२ जणांचे प्राण घेणाऱ्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण दे
ताज्या घडामोडी
तूरडाळ आयातीचे धोरण बदलावे ः खासदार जाधव
केंद्र सरकारने तूरडाळ आयातीचा घेतलेला निर्णय तत्काळ थांबवावा. शेतकऱ्यांच्या हितासाठी तूरडाळ आयातीवर प्रतिबंध लावण्याची मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे.
बुलडाणा : केंद्राच्या आयात धोरणामुळे शेतकऱ्यांना आणखी फटका बसणार आहे. केंद्र सरकारने तूरडाळ आयातीचा घेतलेला निर्णय तत्काळ थांबवावा. शेतकऱ्यांच्या हितासाठी तूरडाळ आयातीवर प्रतिबंध लावण्याची मागणी केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर व पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.
याबाबत खासदार जाधव यांनी सविस्तर मागणीचे पत्रदेखील पाठवले आहे. यात केंद्र सरकारच्या वतीने तूरडाळीच्या आयातीसाठी परवानगी देण्यात आल्याने हे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
शेतकऱ्यांच्या मते कोरोना महामारीने आणि अवकाळी पावसाने गत वर्षात आणि यंदाही पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थ चक्रावर झाला असून, बुलडाणा लोकसभा मतदारसंघासह इतरही अनेक क्षेत्रात यंदाही अवकाळी पावसाने पिके नष्ट केली. विमा कंपनीने अजूनही या संदर्भात मोबदला दिलेला नाही. दुसरीकडे आर्थिक संकटांशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे राष्ट्रव्यापी किसान आंदोलन देखील सुरू आहे.
तूरडाळ आयातीला अनुमती दिल्याने शेतकऱ्यांची अवस्था आणखी कठीण होणार आहे. ६५०० रुपये प्रति क्विंटल चांगला दर सध्या शेतकऱ्यांना मिळतोय. मात्र डाळ आयात झाल्यास यात मोठी तफावत होणार आहे. आयात धोरणात बदल केल्यामुळे डाळींच्या दरात २५ ते ३५ टक्के घसरण झाली होईल. मे २०२१ पर्यंत तूरडाळीचे एकूण उत्पादन पाहून आयात धोरण निश्चित केले जावे. तोपर्यंत तूरडाळ आयातीची परवानगी थांबवावी, अशी मागणीही खासदार जाधव यांनी केली आहे.