अनुदानाअभावी शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’

कागदपत्रांची पूर्तता करून पाच महिने उलटून गेले, अद्याप तुरीचे अनुदान खात्यात जमा झाले नाही. दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानाची आशा होती. राहिलेल्या शेतकऱ्यांवर हा अन्याय का केला जात आहे, हे कळत नाही. शेतकऱ्यांची अवस्था लक्षात घेऊन शासनाने त्वरित हे अनुदान जमा करावे. -संदीप मते, शेतकरी, देगाव
अनुदानाअभावी शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’
अनुदानाअभावी शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’

अकोला : जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातील असंख्य शेतकरी तुरीच्या अनुदानापासून वंचित आहेत. अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’ दिल्याची उपहासात्मक चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे .  

शासनाकडून गेल्या २०१७-१८ हंगामात शेतकऱ्यांकडून तुरीची नोंदणी करण्यात आली होती. क्रमांकाप्रमाणे शेतकऱ्यांना मेसेजद्वारे दिलेल्या तारखेला केंद्रावर तूर आणण्यास कळविण्यात आले. मात्र तेव्हा मोजमाप होऊ शकले नाही. अशा शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा झाली होती. बारदाणा, साठवणुकीकरीता गोदामाची अडचण आदीमुळे तूर खरेदी बंद, सुरू राहत होती. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी होऊ शकली नव्हती. अशातच खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे नोंदणी केलेला शेतकरी नाफेडला तूर विकू शकला नव्हता. खासगी व्यापाऱ्यांना कमी भावात तूर विकावी लागली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. 

शासनाने या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, याकरिता नोंदणी केलेल्या, परंतु तूर विक्रीस आणण्याचा मेसेज न आलेल्या शेतकऱ्यांना एक हजार रुपये क्विंटलप्रमाणे अनुदान स्वरूपात देण्याचे जाहीर केले. तूर विकू न शकलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याकरिता ताबडतोब कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश देण्यात आले. हे अनुदान काही शेतकऱ्यांना मिळालेसुद्धा. परंतु अनेक शेतकरी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. 

शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या तांत्रिक अडचणी आल्यामुळे या भागातील साडेतीनशे शेतकरी त्रुटीत टाकण्यात आले. त्यांना कागपत्रांची पूर्तता करण्यास कळविण्यात आले. त्रुटीमध्ये असलेल्या तालुक्यातील साडेतीनशे शेतकऱ्यांनी त्याचीही पूर्तता करून जवळपास चार ते पाच महिनेसुद्धा झाले. अद्याप हे शेतकरी तूर अनुदानापासून वंचितच आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com