हिंगोलीत हळद खरेदी सुरू

हळद खरेदी
हळद खरेदी
हिंगोली : कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारपासून (ता. ९) यंदाच्या हंगामातील हळद खरेदीस सुरवात झाली. आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार हे तीन दिवस आवक घेतली जाणार आहे. मंगळवारी (ता. १०) हळदीला ५५०० ते ६५०० रुपये क्विंटल दर मिळाले, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
 
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डावर सोमवारी (ता. ९) हळदीची ७  हजार क्विंटल आवक झाली होती. यंदाच्या हंगामातील हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार हे तीन दिवस सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या हळदीची आवक मार्केट यार्डावर घेण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी साडे बारा ते पाच वाजेपर्यंत तसेच दुसऱ्या दिवशी जाहीर लिलावने हळदीची खरेदी केली जाणार आहे.
येत्या काळात ई आॅक्शन पद्धतीने हळद खरेदी केली जाणार आहे.
 
सोमवारी २७१ वाहनातून सुमारे ७ हजार क्विंटल हळदीची आवक झाली होती. सोमवारी (ता. ९) हळदीला सरासरी ५५०० ते ६८०० रुपये आणि मंगळवारी (ता. १०) सरासरी ५५०० ते ६५०० रुपये क्विंटल दर मिळाले. आठवड्यातील तीन दिवस आवक घेतली जाणार आहे. गैरसोय टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेत हळद आणावी, असे आवाहन बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com