agriculture news in Marathi turmeric of 30 crore rupees without sold Maharashtra | Agrowon

तीस कोटींची हळद विक्रीविना पडून

अभिजित डाके
शुक्रवार, 31 जुलै 2020

 यंदाच्या हंगामात बाजार समितीत आज अखेर अंदाजे १३ लाख पोत्यांची विक्री झाली असून एक लाख पोत्यांची थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून विक्री झाली.

सांगली : यंदाच्या हंगामात बाजार समितीत आज अखेर अंदाजे १३ लाख पोत्यांची विक्री झाली असून एक लाख पोत्यांची थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून विक्री झाली. तर, एक लाख पोती शेतकऱ्यांकडे शिल्लक आहेत. शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेल्या हळदीची रक्कम जवळपास तीस कोटी आहे. सध्या ऊन-पावसाचे वातावरण असल्याने हळदीच्या दर्जावर परिणाम होण्याची भीती आहे.

जिल्ह्यातील हळदीची बाजार पेठ सुरु झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत कोरोना विषाणूमुळे बंद झाली. सुमारे अडीच ते तीन महिने व्यापार बंद होता.  

परंतु सौदे पुन्हा सुरु झाल्यानंतर सुरुवातीला ई-नामच्या माध्यमातून झाले. त्यानंतर नेहमीप्रमाणे सौद्यांना प्रारंभ झाला. परंतु शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने लागू केलेल्या लॉकडाउनचा परिणाम बाजारपेठेवर झाला. परिणामी हळदीची विक्री करण्यात देखील अडचणी येत आहेत. 

बाजारात हळदीला अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी न काढता घरीच साठवणूक केली आहे. सध्या कधी ऊन तर कधी पाऊस यामुळे हळदीला डंखाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. परिणामी हळदीच्या दर्जावर परिणाम होण्याची भिती आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

थेट बांधावरूनही खरेदी
वास्तविक पाहता गेल्यावर्षापासून हळद खरेदीचा नवीन ट्रेंड आला आहे. कोचीन आणि बेंगलूर या भागातून अनेक व्यापारी राज्यात येतात शेतकऱ्यांच्या थेट बांधावर खरेदीसाठी जातात. जागेवर पैसे देऊन हळदीची खरेदी केली जाते. गतवर्षी राज्यातील उत्पादनाच्या १० टक्के हळदीची खरेदी शेतावर झाली होती. तर यंदा २० टक्के हळदीची खरेदी शेतातच झाली आहे, अशी माहिती हळद उद्योगातील जाणकारांनी सांगितले.

प्रतिक्रिया
यंदा कोरोनाच्या संकटामुळे स्थानिक हळदीची विक्री अधिक झाली आहे. परंतु सध्या एक लाख हळदीची पोती शेतकऱ्यांच्या घरात तर ५० हजार पोती व्यापाऱ्यांकडे  असून या वातावरणामुळे डंखाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
— गोपाळ मर्दा, हळद व्यापारी सांगली.


इतर अॅग्रो विशेष
तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य पुणे : कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस...
हा तर मत्स्य दुष्काळाच! जगातील आघाडीच्या ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये भारताचा...
कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला...
पेरणीची घाई नको : कृषी आयुक्तालयपुणेः राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
मॉन्सूनला पोषक वातावरण पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास...
दूध दरातील कापतीने शेतकऱ्यांची परवड औरंगाबाद: महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११...
पीककर्ज व्याज सवलत योजनेचे पालकत्व...पुणेः शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन...
राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के...पुणे ः मे आणि जून महिन्यात पाण्याची मागणी...
कमी दराने कांदा खरेदी सुरूच नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के...नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि...
दूध दरासाठी गुरुवारी आंदोलन नगर : लॉकडाउनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक...
विद्यापीठाच्या वाणांमुळे शेतकऱ्यांना ९५...नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित...
गांडुळखताचा लोकप्रिय केला शुभम ‘ब्रॅण्ड’सोलापूर जिल्हयातील उपळाई बुद्रूक येथील महादेव...
सिंधुदुर्गमध्ये मुसळधारसिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार...
प्रयोगशील, अभ्यासपूर्ण शेतीचा आदर्शतिडका (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी ईश्‍वर...
शेतकऱ्यांचे धान बोनसचे १७ कोटी रुपये...चंद्रपूर : गेल्या खरीप हंगामात विक्री केलेल्या...
मॉन्सून उद्या दिल्लीत पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने उत्तरेत...
समुद्रातील माशांचा साठा केवळ ६६ टक्के...रत्नागिरी ः समुद्रातील माशांचा साठा कमी होत असून...
दीडपट हमीभावाचा केंद्राचा दावा फसवा पुणेः किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) माध्यमातून...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची ...नाशिक : अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन पेरणीला...