agriculture news in marathi Turmeric and jaggery market auction starts in Sangli APMC | Page 3 ||| Agrowon

सांगली मार्केट यार्डात हळद-गूळ सौद्यांना प्रारंभ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021

सांगली बाजार समितीमध्ये दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गूळ आणि हळदीच्या नवीन हंगामाच्या सौद्यात गुळाला उच्चांकी ३९५१ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर हळदीला साडेआठ हजार ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गूळ आणि हळदीच्या नवीन हंगामाच्या सौद्यांना प्रारंभ झाला. मुहूर्ताच्या सौद्यात गुळाला उच्चांकी ३९५१ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर हळदीला साडेआठ हजार ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. मुहूर्ताच्या सौद्यात चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

मार्केट यार्डात प्रतिवर्षी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गूळ आणि हळदीच्या नवीन हंगामाच्या सौद्यांना प्रारंभ होतो. मुहूर्ताच्या सौद्याकडे शेतकरी, व्यापारी आदींचे लक्ष लागलेले असते. बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्या हस्ते या सौद्यांचा प्रारंभ झाला. सौद्यात गुळाला उच्चांकी ३९५१ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. गुळाचा दर पहिल्याच सौद्याला ३४०० ते ३९५१ रुपये इतका राहिला. पहिल्या दिवशी १५०० पोत्यांचे सौदे झाले. हळदीच्या सौद्यालाही उत्साहात सुरवात झाली. हळदीला सहा हजार ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटलइतका दर मिळाला. मुहूर्तावर बेदाणा सौद्यास देखील प्रारंभ झाला.

सभापती श्री. पाटील, सचिव महेश चव्हाण, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, गूळ व्यापारी संघटनेचे हरीश पाटील, हळद व्यापारी सतीश पटेल, मनोहर सारडा, गोपाळ मर्दा, शरद पाटील, बेदाणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार, मनोज मालू, शेखर ठक्कर, पणू सारडा, रूपेश पारेख, अभिजित पाटील आदींसह अडते, व्यापारी, शेतकरी, खरेदीदार, हमाल उपस्थित होते. 


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांनाही थंडी जाणवते भाऊ!जलालखेडा, जि. नागपूर ः नरखेड तालुक्यात रब्बी...
‘मँगोनेट’ अंतर्गत सात वर्षांत ४, ५६६... रत्नागिरी : हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील...
‘जलजीवन मिशन’च्या कामात सातारा अग्रेसरसातारा : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात २३७...
नाशिकमधील उन्हाळ कांद्याचा साठा अखेरीकडेनाशिक : फेब्रुवारी २०२१पासून उन्हाळ कांद्याची...
पाणीपट्टी ऊसबिलातून वसूल केल्यास आंदोलनसांगली ः  शेतकऱ्यांकडील पाणीपट्टीची रक्कम...
अकोला जिल्हा परिषदेत नववर्षातही राजकीय...अकोला ः गेले वर्षभर जिल्हा परिषदेत सुरू असलेले...
पुणे विभागात ज्वारी क्षेत्रात...पुणे : परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने...
येल्लकी वाणाच्या केळीला क्विंटलला चार...जळगाव  ः वढोदा (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील...
घरच्या घरी भाजीपाल्यासाठी ‘जिजाई नॅनो...सोलापूर ः घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने आणि अगदी...
बलून बंधाऱ्यांसाठी गिरणा परिक्रमा सुरू जळगाव ः  गिरणा नदीवर प्रस्तावित बलून...
घाटणे बॅरेजमध्ये गेलेल्या जमीनीची...सोलापूर ः मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन...
पुणे जिल्ह्यात ९ हजारांवर कुटुंबांना...पुणे ः ‘‘राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जिल्ह्यात...
पाटण तालुक्यात पुराच्या धोक्याकडे...मोरगिरी, जि. सातारा : तालुक्यात वाढत्या पावसाच्या...
मराठवाड्यात २१ लाख २१ हजार हेक्‍टरवर...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा रब्बी पेरणीत आजवर २१...
परभणी, हिंगोलीत ‘शेतमाल तारण’द्वारे दोन...परभणी ः ‘‘शेतीमाल तारणकर्ज योजनेअंतर्गत परभणी...
‘सिद्धेश्वर’ च्या अध्यक्षपदी काडादी, ...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर...
सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळावर... सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
लासलगाव येथे खत विक्रेत्याकडून जादा...नाशिक: रब्बी हंगामातील पेरण्या सुरू असून काही...
उष्णता ताणाचे वासराच्या आरोग्यावर दीर्घ...दुधाळ जनावरांवर उष्णतेच्या ताणाचा...
नांदुरा येथे कापसाचे दर नऊ हजार रुपये...नांदुरा, जि. बुलडाणा ः कॉटनबेल्ट म्हणून ओळख...