सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९०० रुपये

सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९०० रुपये
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९०० रुपये

सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली आहे. मंगळवारी (ता. १६) स्थानिक हळदीची १२१६ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ६००० ते ८९०० तर सरासरी ७९०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजारसमितीत गुळाची आवक कमी अधिक प्रमाणात होते आहे. गुळाची २३३४ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २९०० ते ३७७१, तर सरासरी ३३३५ रुपये असा दर होता. परपेठ हळदीची १६३ क्विंटल आवक झाली होती. परपेठ हळदीस प्रतिक्विंटल ४००० ते ७४२५, तर सरासरी ५७०० रुपये असा दर मिळाला.

विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची ४९०० क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ५०० ते १६००, तर सरासरी १०५० रुपये असा दर मिळाला. बटाट्याची १६७० क्विंटल आवक झाली होती. बटाट्यास प्रतिक्विंटल १००० ते १३००, तर सरासरी ११५० रुपये असा दर मिळाला. 

डाळिंबाची २२० किलो आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस १०० ते ५००, तर सरासरी ३०० रुपये असा दर मिळाला. मोसंबीची १२३० किलोची आवक झाली होती. मोसंबीस प्रति दहा किलोस २०० ते ५००, तर सरासरी ४५० रुपये असा दर मिळाला. संत्रीची १६६० किलोची आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस २०० ते ५००, तर सरासरी ३५० रुपये असा दर होता. डाळिंबाची २२०० किलोची आवक झाली होती. 

डाळिंबास प्रति दहा किलोस १०० ते ५०० तर सरासरी ३०० रुपये असा दर मिळाला. चिकूची २८०० किलोची आवक झाली होती. त्यास प्रति दहा किलोस १०० ते ५००, तर सरासरी ३०० रुपये असा दर मिळाला. सीताफळाची १५०० किलोची आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस १०० ते ३००, तर सरासरी २०० रुपये असा दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com