agriculture news in Marathi turmeric arrival increasing in APMCs Maharashtra | Agrowon

हळदीची आवक वाढू लागली 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 मार्च 2021

बाजार समित्यांत हळदीची आवक वाढू लागली आहे. सांगलीत सकाळी राजापुरी, तर सायंकाळी परपेठ हळदीचे सौदे सुरू झाले आहे. 

सांगली/परभणी ः बाजार समित्यांत हळदीची आवक वाढू लागली आहे. सांगलीत सकाळी राजापुरी, तर सायंकाळी परपेठ हळदीचे सौदे सुरू झाले आहे. सध्या दर काहीसे कमी झाले असले, तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत दीड ते दोन हजारांनी सुधारलेले आहेत. पुढील काही दिवस हळदीची आवक आणि दर स्थिर राहतील, दरात फारसे चढ-उतार होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. 

सांगली बाजार समितीत जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातून हळदीची आवक वाढली आहे. त्याचप्रमाणे निजामाबाद, सदाशिवपेठ, नांदेड वसमत या ठिकाणांहून हळद सौद्यासाठी येऊ लागली आहे. त्यामुळे स्थानिक म्हणजे राजापुरी हळदीचे सौदे सकाळी निघतात. तर महाराष्ट्रातील सांगली सोडून इतर जिल्ह्यांसह परराज्यांतील हळदीची आवक होऊ लागल्याने परपेठ या हळदीचे सौदे सायंकाळी होतात. वास्तविक पाहता मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दिवसातून दोन वेळा सौदे सुरू झाले. परिणामी, हळदीच्या आवकीत वाढ झाली. 

गेल्या तीन दिवसांपासून दररोज स्थानिक हळदीची ५५ ते ६० हजार क्विंटल, तर परपेठ हळदीची ७ ते ११ हजार क्विंटल अशी ६० ते ७० हजार क्विंटल आवक होत आहे. हळदीच्या आवकीत वाढ झाली असल्याने गेल्या आठवड्यापेक्षा चालू आठवड्यात दरात काहीशी घसरण झाली आहे. मात्र,सध्याची हळदीची आवक पाहता, हळदीच्या दरात चढ-उतार होण्याची फारशी शक्यता नसून दर स्थिर राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. 

हिंगोली येथील संत नामदेव हळद मार्केटमध्ये सध्या एक दिवस आड हळदीची आवक घेण्यात येत आहे. मंगळवारी हळदीची ६५० क्विंटल आवक झाली होती. तर वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हळदीची काही प्रमाण आवक सुरू झाली आहे. मंगळवारी वसमतमध्ये २००० क्विंटल हळदीची आवक होती. 

सांगली बाजार समितीतील हळदीचे दर (रुपये/क्विंटल) 

प्रकार १६ फेब्रुवारी ९ फेब्रुवारी 
सेलम कणी ७८०० ते ८५०० ८८०० ते ९३०० 
मध्यम ८५०० ते ८८०० ९८०० ते १०५०० 
उच्च लगडी १२५०० ते १३०० १२५०० ते १४५०० 

महत्त्वाच्या बाजारांतील दर (रुपये/क्विंटल)

बाजार किमान कमाल सरासरी 
हिंगोली ८०५० ८७५० ८४०० 
वसमत ७००० ९५०० ८२५० 

प्रतिक्रिया
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हळदीच्या दरात दीड ते दोन हजारांनी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी कृत्रिम दराच्या तेजीला बळी न पडता, योग्य विचार करून योग्य बाजारपेठेत हळदीची विक्री करावी. 
- हार्दिक सारडा, हळद व्यापारी, सांगली 

हळदीच्या दर्जावर दर मिळत आहेत. त्यामुळे दर्जा ठेवून हळदीचे उत्पादन घेत असल्याने चांगले दर मिळतात. शेवटी दर हे आवकेवर अवलंबून असल्याने दरात चढ उतार होतो. गेल्या आठवड्यापेक्षा चालू आठवड्यात दरात घसरण झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा दर चांगले असल्याने फायदेशीर आहेत. 
- मयूर पावणे, हळद उत्पादक, कालवडे, ता. कराड 


इतर अॅग्रोमनी
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
सोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के...नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि...
मोहरीतील तेजीची कारणे  वेगळीच ः विजय...नागपूर : बाजारात हमीभावापेक्षा मोहरीला जास्त दर...
प्रक्रियायुक्‍त खाद्यपदार्थांच्या...नवी दिल्ली : कोरोनाकाळात सर्वच क्षेत्रांना मोठ्या...
दुसऱ्या लाटेचा बासमती तांदळास फटका कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बासमती...
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...
इंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर...कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांत देशातून निर्यात...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
साखर निर्यातीचा ‘गोडवा’ वाढलाकोल्हापूर : केंद्राकडून साखर निर्यात धोरण जाहीर...
पाम तेल आयातीवर श्रीलंकेचा ‘सर्जिकल...कोलंबो : श्रीलंका सरकारने पाम तेलाच्या आयातीवर...
सोयाबीनची तेजी अबाधित पुणे ः यंदा सोयाबीच्या दरांमध्ये झालेली सुधारणा...
भारताकडून पिवळ्या वाटाण्याची आयात बंद पुणे ः युक्रेनमधून पिवळ्या वाटाण्याची आयात करणारा...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः यंदाचा बेदाणानिर्मितीचा हंगाम अंतिम...
हरभरा दरवाढीचे संकेतपुणे ः देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक...
कापूस लागवडीत यंदा घट शक्यपुणे ः पुढील दोन ते तीन महिन्यांत खरीप लागवड सुरू...
भारताने आयात-निर्यात धोरणांत बदल करू नयेपुणे ः केंद्र सरकारकडून आयात-निर्यातीच्या...
ब्राझीलच्या साखरेचा आंतरराष्ट्रीय...कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत...
खाद्य तेलाच्या किमती आटोक्यात आणणार :...नवी दिल्ली : देशातील खाद्य तेलाच्या किरकोळ...