हळदीच्या आवकेत वाढ

हळदीचा हंगाम सुरु झाल्यापासून सहा ते सव्वासहा लाख (एक पोते ५० किलोचे) पोत्यांची विक्री झाली. सांगली बाजार समितीत दरवर्षी १२ ते १३ लाख पोत्यांची आवक होते.
turmeric
turmeric

सांगली ः हळदीचा हंगाम सुरु झाल्यापासून सहा ते सव्वासहा लाख (एक पोते ५० किलोचे) पोत्यांची विक्री झाली. सांगली बाजार समितीत दरवर्षी १२ ते १३ लाख पोत्यांची आवक होते. देशी कडपा हळदीची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे हळदीचे दर स्थिर आहेत. सोमवारी (ता.२२) हळदीला ७५०० ते १०५०० रुपये दर मिळाले

सांगली बाजार समितीत हळदीच्या आवकीत वाढ होऊ लागली आहे. सोमवारी (ता. २२) हळदीची ३५ हजार १४२ क्विंटल आवक झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून देशी कडपा हळदीची आवक येवू लागली आहे. या हळदीला देखील मागणी अधिक आहे. हळदीचा हंगाम सुरु झाल्यापासून नव्या हळदीची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. 

सांगली बाजार समितीत सांगली, सातारा जिल्ह्यासह परराज्यातील हळदीची सुमारे १२ ते १३ लाख पोत्यांची आवक होते. यंदा देशात सुमारे १५ टक्के हळदीचे पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे उत्पादन घटीची शक्यता असल्याने सांगली बाजार समितीत अंदाजे १० ते १२ लाख पोत्यांची आवक होईल, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे.  सध्या सहा ते सव्वा सहा लाख पोत्यांची विक्री झाली.

देशातील हळद उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रासह अन्य राज्यातील हळदीच्या बाजारपेठेत हळदीची आवक वाढली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाजारात हळदीची आवक वाढली आहे. परिणामी हळदीची आवक वाढली असली तरी सांगलीतील हळदीचे दर स्थिर आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वीपेक्षा सोमवारच्या सौद्यात हळदीच्या दरात १०० ते २०० रुपयांनी घसरण झाली असल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले. सोमवार (ता. २२) हळदीचे दर ७८०० ते ८००० सेलम कणी ७५०० ते ७८०० देशी कडपा  ८५०० ते ८००० मध्यम ९५०० ते १०५०० उच्च लगडी हिंगोली, वसमतमध्ये सौदे मराठवाड्यातील बाजारांमध्येही हळदीची आवक वाढत आहे. हिंगोली, परभणी, वसमत आणि नांदेड बाजारात हळदीचे सौदे होत आहेत. आवकेच्या हंगामाच्या प्रारंभी हळदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली होती. त्यात मात्र आता काहीसा दबाव आला आहे. विभागातील बाजार समित्यांसह शेजारच्या जिल्ह्यांतही आवक वाढत असल्याने दरवाढीवर परिणाम झाला आहे. हिंगोली येथील संत नामदेव हळद मार्केटमध्ये सोमवार (ता.२२) १२०० क्विंटल हळदीची आवक झाली होती. या वेळी हळदीला किमान ७००० कमाल ९२२५ तर सरासरी ८११२ रुपये दर मिळाला होता. वसमत येथील बाजार समितीत शनिवारी हळदीचे सौदे झाले होते. या वेळी हळदीची ७२४ क्विंटल आवक झाली होती. हळदीला किमान ७५००, कमाल ९६४० तर सरासरी ८१०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. सोमवारी परभणी बाजार समितीत सौदे झाले नव्हते.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com