agriculture news in Marathi turmeric arrival raised in market Maharashtra | Page 4 ||| Agrowon

हळदीच्या आवकेत वाढ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 मार्च 2021

हळदीचा हंगाम सुरु झाल्यापासून सहा ते सव्वासहा लाख (एक पोते ५० किलोचे) पोत्यांची विक्री झाली. सांगली बाजार समितीत दरवर्षी १२ ते १३ लाख पोत्यांची आवक होते.

सांगली ः हळदीचा हंगाम सुरु झाल्यापासून सहा ते सव्वासहा लाख (एक पोते ५० किलोचे) पोत्यांची विक्री झाली. सांगली बाजार समितीत दरवर्षी १२ ते १३ लाख पोत्यांची आवक होते. देशी कडपा हळदीची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे हळदीचे दर स्थिर आहेत. सोमवारी (ता.२२) हळदीला ७५०० ते १०५०० रुपये दर मिळाले

सांगली बाजार समितीत हळदीच्या आवकीत वाढ होऊ लागली आहे. सोमवारी (ता. २२) हळदीची ३५ हजार १४२ क्विंटल आवक झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून देशी कडपा हळदीची आवक येवू लागली आहे. या हळदीला देखील मागणी अधिक आहे. हळदीचा हंगाम सुरु झाल्यापासून नव्या हळदीची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. 

सांगली बाजार समितीत सांगली, सातारा जिल्ह्यासह परराज्यातील हळदीची सुमारे १२ ते १३ लाख पोत्यांची आवक होते. यंदा देशात सुमारे १५ टक्के हळदीचे पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे उत्पादन घटीची शक्यता असल्याने सांगली बाजार समितीत अंदाजे १० ते १२ लाख पोत्यांची आवक होईल, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे.  सध्या सहा ते सव्वा सहा लाख पोत्यांची विक्री झाली.

देशातील हळद उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रासह अन्य राज्यातील हळदीच्या बाजारपेठेत हळदीची आवक वाढली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाजारात हळदीची आवक वाढली आहे. परिणामी हळदीची आवक वाढली असली तरी सांगलीतील हळदीचे दर स्थिर आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वीपेक्षा सोमवारच्या सौद्यात हळदीच्या दरात १०० ते २०० रुपयांनी घसरण झाली असल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले.

सोमवार (ता. २२) हळदीचे दर
७८०० ते ८०००
सेलम कणी
७५०० ते ७८००
देशी कडपा 
८५०० ते ८०००
मध्यम
९५०० ते १०५००
उच्च लगडी

हिंगोली, वसमतमध्ये सौदे
मराठवाड्यातील बाजारांमध्येही हळदीची आवक वाढत आहे. हिंगोली, परभणी, वसमत आणि नांदेड बाजारात हळदीचे सौदे होत आहेत. आवकेच्या हंगामाच्या प्रारंभी हळदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली होती. त्यात मात्र आता काहीसा दबाव आला आहे. विभागातील बाजार समित्यांसह शेजारच्या जिल्ह्यांतही आवक वाढत असल्याने दरवाढीवर परिणाम झाला आहे. हिंगोली येथील संत नामदेव हळद मार्केटमध्ये सोमवार (ता.२२) १२०० क्विंटल हळदीची आवक झाली होती. या वेळी हळदीला किमान ७००० कमाल ९२२५ तर सरासरी ८११२ रुपये दर मिळाला होता. वसमत येथील बाजार समितीत शनिवारी हळदीचे सौदे झाले होते. या वेळी हळदीची ७२४ क्विंटल आवक झाली होती. हळदीला किमान ७५००, कमाल ९६४० तर सरासरी ८१०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. सोमवारी परभणी बाजार समितीत सौदे झाले नव्हते. 
 
 


इतर अॅग्रोमनी
दुसऱ्या लाटेचा बासमती तांदळास फटका कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बासमती...
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...
इंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर...कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांत देशातून निर्यात...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
साखर निर्यातीचा ‘गोडवा’ वाढलाकोल्हापूर : केंद्राकडून साखर निर्यात धोरण जाहीर...
पाम तेल आयातीवर श्रीलंकेचा ‘सर्जिकल...कोलंबो : श्रीलंका सरकारने पाम तेलाच्या आयातीवर...
सोयाबीनची तेजी अबाधित पुणे ः यंदा सोयाबीच्या दरांमध्ये झालेली सुधारणा...
भारताकडून पिवळ्या वाटाण्याची आयात बंद पुणे ः युक्रेनमधून पिवळ्या वाटाण्याची आयात करणारा...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः यंदाचा बेदाणानिर्मितीचा हंगाम अंतिम...
हरभरा दरवाढीचे संकेतपुणे ः देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक...
कापूस लागवडीत यंदा घट शक्यपुणे ः पुढील दोन ते तीन महिन्यांत खरीप लागवड सुरू...
भारताने आयात-निर्यात धोरणांत बदल करू नयेपुणे ः केंद्र सरकारकडून आयात-निर्यातीच्या...
ब्राझीलच्या साखरेचा आंतरराष्ट्रीय...कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत...
खाद्य तेलाच्या किमती आटोक्यात आणणार :...नवी दिल्ली : देशातील खाद्य तेलाच्या किरकोळ...
अन्नप्रक्रिया उद्योगासाठी १०,९००...नवी दिल्ली : देशातील अन्नप्रक्रिया उद्योगासाठी (...
सांगली बाजारात हळदीचे दर स्थिर सांगली ः गेल्या आठवड्यापासून हळदीचे दर स्थिर असून...
चीनच्या मागणीने शेंगदाणा दराला आधार पुणे : शेंगदाण्याची बाजारात गेल्या वर्षीच्या...
राज्यात शिल्लक साखरेचा बोजा कायम कोल्हापूर : यंदाचा साखर हंगाम अंतिम टप्प्यात येत...
लातूरला सोयाबीनचा भाव साडे पाच हजारावरलातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
हळदीच्या आवकेत वाढसांगली ः हळदीचा हंगाम सुरु झाल्यापासून सहा ते...