कोरोनाचा फटका : सांगलीत हळदीचे सौदे रद्द

कोरोनाचा फटका : सांगलीत हळदीचे सौदे रद्द
कोरोनाचा फटका : सांगलीत हळदीचे सौदे रद्द

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ही हळदीची बाजार पेठ म्हणून देशभर प्रसिध्द आहे, मात्र कोरोनामुळे सोमवारी हळदीचे सौदे होऊ शकले नाहीत, परिणामी सुमारे आठ ते दहा कोटींचा फटका बसला आहे. दरम्यान सोमवारी गुळाचे सौदे मात्र नियमित सुरू राहिले.

कोरोनाचा विळखा जगभर पडत असताना, त्याचा शिरकाव आता महाराष्ट्रातही झाला आहे. याबाबत प्रतिबंधात्मक उपायोजना सुरू झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यात एकही कोरोनाचा रूग्ण नसला तरी, लोकांमध्ये कोरोना बाबत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान प्रशासनाकडून देखील गर्दीच्या ठिकाणी जाणे किंवा सार्वजनिक कार्यक्रम, सभा, संम्मेलने टाळण्याचे अवाहन केले आहे. याला जिल्ह्यातील नाकरीकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

दरम्यान याचा फटका आता व्यवहार आणि उलाढालीवर जाणवू लागला आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ही देशातील नामांकीत हळदीची बाजारपेठ, येथील गुणवत्ता आणि विश्वासार्हतेमुळे बाजारपेठ देशभर प्रसिध्द आहे, मात्र याच ठिकाणी सोमवारी कोरोनाच्या धास्तीने आणि प्रतिबंधात्मक अवाहनाला प्रतिसाद म्हणून हळदीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले. सोमवारी हळदीचे सौदे न झाल्यामुळे सुमारे आठ ते दहा कोटींची उलाढाल ठप्प राहिल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सांगण्यात आले. दरम्यान गुळाचे सौदे मात्र नियमित वेळेत पार पडले, मात्र तेथेही कोरोनाची छाया पहायला मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com