agriculture news in Marathi, turmeric auction start in Sangali, Maharashtra | Agrowon

हळद सौद्याला प्रारंभ

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019

शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतीमाल बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा. आज पहिल्याच दिवशी हळदीला चांगला दर मिळाला आहे. यंदाच्या सीझनमध्ये विक्रमी आवक होईल.
-दिनकर पाटील, सभापती, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती

सांगली  ः  येथील सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ३०) हळदीच्या नवीन सौद्यांना प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी १२ हजार २६० पोत्यांची आवक झाली. या वेळी हळदीस सात ते १२, ६०० रुपये प्रतीक्विंटल दरम्यान दर मिळाला. पहिल्याच सौद्याला महाराष्ट्र आणि कर्नाटक परिसरातील हळदीची आवक झाली होती. हळदीला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. 

समिती आवारातील हळद, गूळ, बेदाणा व्यापाऱ्यांना केंद्रीय `जीएसटी'' विभागाने सेवाकराच्या नोटिसा दिल्यामुळे व्यापाऱ्यांनी सौदे बंद ठेवले होते. १२ दिवस व्यापार बंद राहिल्याने सौदे ठप्प होते. जानेवारीपासून हळदीचे सौदे सुरू होतात. परंतु, व्यापार बंदमुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण होते. 

बंदमुळे हळद अन्य बाजारपेठेत नेण्याच्या विचारात शेतकरी होते. परंतु, तत्पूर्वी पालकमंत्री सुभाष देशमुख व खासदार संजय पाटील यांनी मध्यस्थी करून व्यापाऱ्यांना आवाहन केले. त्यानंतर २५ जानेवारी रोजी बंद मागे घेण्यात आला. २६ जानेवारी रोजी गूळ सौदे सुरूही झाले. 

हळद सौद्याला सभापती दिनकर पाटील यांच्या हस्ते प्रारंभ झाला. बावची (ता. वाळवा) येथील शेतकरी राजेंद्र शिनगारे यांच्या १२ पोत्यांच्या कलमास जय श्रीराम ट्रेडर्स दुकानात प्रतिक्विंटल १२ हजार ६०० रुपये दर मिळाला. श्रीराम मालू यांनी खरेदी केली. पहिल्याच सौद्यात महाराष्ट्र व कर्नाटक परिसरातील १२ हजार २६० पोत्यांची आवक झाली. सात हजारांपासून १२ हजारांहून अधिक दर मिळाला. शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. 

सौद्यासाठी बाजार समिती संचालक जीवन पाटील, शीतल पाटील, बाळासाहेब बंडगर, सचिव एन. एम. हुल्याळकर, सहायक सचिव आर. ए. पाटील, हळद संघटना अध्यक्ष सतीश पटेल, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, अडत संघटना अध्यक्ष राजेंद्र पाटील, हळद व्यापारी गोपाळ मर्दा, नूल शहा, मनोहर सारडा, श्रीकांत मालू, प्रदीप चौगुले, कौशल शहा, केतन काब्रा, बन्सीलाल ओस्तवाल आदी उपस्थित होते.


इतर अॅग्रो विशेष
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...
देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत...
मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरणऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद...औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
राज्यात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री...औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक...
रुतलेले अर्थचक्राने विकासालाही ‘ब्रेक’''मूडी'' या पतमानांकन संस्थेने अलीकडेच आपला अहवाल...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...