agriculture news in Marathi, turmeric crop damage in Sangali, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

महापुराने हळद काळवंडली
टीम अॅग्रोवन
रविवार, 8 सप्टेंबर 2019

दोन महिन्याचं हळदीचं पीक होतं. शेतात नदीच पाणी आलं आणि सारं नष्ट झालं. आत्तापर्यंत दोन लाख रुपये खर्च घातला होता. तो सगळा पाण्यात गेला. त्याच बरोबर ठिबकचे संच वाहून गेल्याने दुहेरी फटका बसला आहे. त्याची नुकसानभरपाई मिळावी.
- मनोज पाटील, मौजे डिग्रज, ता. मिरज.

सांगली : दोन महिन्याचं हळदीचं पीक होतं. नदीचं पाणी शेतात आलं. शेतानं तळ्याचं रूप धारण केलं. त्यामुळे हळद काळवंडली. पिकावर आत्तापर्यंत दोन लाख रुपये खर्च केला होता. घातलेला पैसाही आता मिळणार नाही, अशी व्यथा हळद उत्पादक शेतकरी सांगत होते. अतिपावसाचा फटका हळद पिकाला बसला असून, जिल्ह्यातील सुमारे २० टक्के हळदीचे नुकसान झाले आहे. 

जिल्ह्यात दरवर्षी अक्षय तृतीयेपासून हळद लागवडीस प्रारंभ होतो. सुरवातीच्या काळात पाऊस नसल्याने हळदीची लागवड उशिरा झाली. त्यानंतर शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत होते. ऑगस्टच्या पहिल्या दिवसापासून जिल्ह्यात पावसाने जोर धरला. त्यामुळे शेतकरी समाधानी झाला. परंतु पावसाचा जोर वाढतच राहिल्याने शेतकरी चिंतातुर झाला. नदीकाठी असलेली हळद पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली. शेतात पाच ते सहा दिवस पाणी साचल्याने पीक कुजून गेले.

शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च केले आणि पीक वाया गेल्याने आता करायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यापुढे निर्माण झाला आहे. अनेक भागांतील शेतकऱ्यांनी पिकात साचलेले पाणी काढून दिल्याने पाण्याचा निचरा झाला. त्या ठिकाणची हळद पीक वाचले आहे. परंतु कंद कूज यांसह विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांना आर्थिक खर्च करावा लागणार आहे. 

उत्पादनात मोठ्या घटीची शक्यता
जिल्ह्यात सरासरी एक हजार हेक्टरवर हळदीची लागवड क्षेत्र असून, त्यातून सरासरी ६ हजार टन उत्पादन मिळते. यंदा हळदीची लागवड १ हजार ४०० हेक्टर वर झाली असल्याचे हळद संशोधन केंद्राने सांगितले. महापुराचा फटका हळदीला बसल्याने या हंगामात हळदीचे सुमारे २० टक्के नुकसान असल्याने हळदीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता हळद उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...
मज चंद्र हवास्थळ बंगळूर, सात सप्टेंबरची मध्यरात्र, वेळ १...
विविधतेतच एकताहिंदी भाषा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित...
एकत्रित प्रयत्नांमधून झाले लष्करी अळी...नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने...
पुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात...पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच...
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...
‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनच!देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...
एकरी सात टन भाताचे विक्रमी उत्पादनरत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य...
लष्करी अळीमुळे येतेय दूध व्यवसायावर संकटनगर ः मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या...