Agriculture news in marathi turmeric crop management | Agrowon

हळदीवरील कीड, रोगांचे नियंत्रण

डॉ. मनोज माळी,डॉ. रावसाहेब पवार
शुक्रवार, 31 जुलै 2020

सध्याच्या काळात काही भागात पाने पिवळी पडत आहेत. याची लक्षणे तपासून कीड, रोग नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.
 

हळदी पिकामध्ये करपा, कंदकूज रोग आणि रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव झाल्यास पाने पिवळी पडतात. सध्याच्या काळात काही भागात पाने पिवळी पडत आहेत. याची लक्षणे तपासून कीड, रोग नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

रोगांचा प्रादुर्भाव 
करपा

रोगामुळे पाने पिवळी पडतात. पानांवर तपकिरी रंगाचे ठिपके प्रथमतः खालच्या पानांवर पडतात.

नियंत्रण

 • रोगट पाने कापून जाळून टाकावीत. शेतात स्वच्छता ठेवावी.
 • मॅन्कोझेब २ ते २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ते ३ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. (ॲग्रेस्को शिफारस)

कंदकूज 

 • सुरळीतील पानांचे शेंडे वरून आणि कडांनी पिवळे पडून १ ते १.५ सें.मी. खालीपर्यंत वाळत जातात. पुढे हळदीचे पान संपूर्णपणे वाळते.
 • खोडाचा जमिनीलगतचा बुंधा काळपट पडतो. या ठिकाणी माती बाजूस करून पाहिल्यास गड्डाही वरून काळा पडलेला व निस्तेज झालेला दिसतो. या भागावर दाब दिल्यास त्यातून कुजलेले, घाण वास येणारे पाणी बाहेर येते.
 • रोगग्रस्त सुरळी जर ओढली तर चटकन झाड सहज हातात येते.
 • वैशिष्टयपूर्ण पिवळ्या निस्तेज पानांमुळे हा रोग ओळखता येतो.

नियंत्रण

 • शेतात पाणी साठू देऊ नये.
 • प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ट्रायकोडर्मा प्लस प्रति एकरी २ ते २.५० किलो प्रति २५० ते ३०० किलो शेणखतामध्ये मिसळून जमिनीत पसरून द्यावी.
 • कॉपर ऑक्सिक्लोराईड ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून आळवणी.
 • जास्त प्रादुर्भाव असल्यास मेटॅलॅक्झील (८ टक्के) अधिक मॅंन्कोझेब (६४ टक्के) संयुक्त बुरशीनाशक २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून आळवणी. (ॲग्रेस्को शिफारस)

किडींचा प्रादुर्भाव
कंद माशी

 • माशी उघड्या हळद कंदावर अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या उघड्या गड्ड्यामध्ये शिरून उपजीविका करतात.
 • अशा गड्ड्यामध्ये नंतर पिथिअम बुरशी आणि सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होतो. खोड व गड्डे कुजतात. पाने पिवळी पडतात.

नियंत्रण

 • उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत.
 • क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) किंवा डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १ मिलि प्रती लिटर पाण्यात मिसळून जुलै ते ऑक्टोबर दरम्यान १५ दिवसांच्या अंतराने गरजेनुसार फवारावे. (ॲग्रेस्को शिफारस)

तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी 
कीड पानांखाली राहून पानातील रस शोषण करते.त्यामुळे पाने
पिवळी पडतात.

नियंत्रण

 • निंबोळीवर आधारित कीटकनाशक (अझाडिरेक्टीन १०,००० पीपीएम) ३ मिलि. किंवा
 • डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १ मिलि प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी. (ॲग्रेस्को शिफारस)

संपर्क- डॉ. मनोज माळी,९४०३७ ७३६१४
(हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज, जि.सांगली)


इतर कृषी सल्ला
मराठवाड्यात पावसाच्या अंदाजानुसार ऑगस्ट...एकंदरीत या वर्षी मराठवाड्यात बहुतांश भागात...
असे होते ग्लायफोसेट तणनाशकाचे निसर्गात...केंद्र सरकारकडून नुकताच मसुदा आदेश प्रसिध्द...
उभ्या पिकात मूलस्थानी जलसंवर्धनकोरडवाहू शेतीमध्ये जमिनीतील पाण्याची कमतरता पाहता...
घरोघरी असावी पोषण परसबागपरसबागेचा आकार हा जागेची उपलब्धता, कुटुंबातील...
राज्यामध्ये येत्या काळात चांगल्या...कोकण, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या पूर्व...
हळदीवरील कीड, रोगांचे नियंत्रणहळदी पिकामध्ये करपा, कंदकूज रोग आणि रस शोषण...
काडी पक्वतेच्या अवस्थेतील अन्नद्रव्य...सध्याच्या परिस्थितीत बहुतांश द्राक्ष बागेत...
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनगुलाबी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण, मित्र कीटकांचे...
फ्लॉवर पिकातील विकृतीची लक्षणेव्हीप टेल  या विकृतीमध्ये फुलकोबीच्या...
हळदीची पाने पिवळी पडण्याची समस्या अन्...सध्या काही भागात हळदीची पाने पिवळे पडण्याची...
सोयाबीनवरील हिरव्या उंट अळीचे नियंत्रणसद्य परिस्थितीत सोयाबीन वाढीच्या अवस्थेत असून...
फ्लाॅवर पिकातील विकृतीची लक्षणेभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
मक्यावरील लष्करी अळीचे नियंत्रणमका हे खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक असून, मका...
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनात जैविक...पिकांच्या वाढीसाठी विविध अन्नद्रव्यांची आवश्यकता...
तुरळक ठिकाणी अल्प ते मध्यम पावसाची शक्‍...या आठवड्यात महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसाची...
खरिपासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनाहवामानातील बदलांमुळे पिकांचे कधीही नुकसान होऊ...
काडी परिपक्वतेच्या अवस्थेतील रोग...द्राक्ष बागेत सध्याच्या परिस्थिती जुलै...
तपासा बियाण्याची सजलीकरण शक्तीप्रत्येक जातीच्या बियाणाची उगवण शक्ती वेगवेगळी...
कृषी सल्‍ला ( ज्वारी, सोयाबीन, संत्रा/...पेरणीयोग्‍य पाऊस झालेला असल्‍यास जमिनीत पुरेसा...
कृषी सल्ला (आडसाली ऊस, तूर, कापूस,...पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात मित्र कीटकांची...