Agriculture news in Marathi Turmeric is cultivated on 2.5 lakh hectares in the country | Agrowon

देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवड

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जून 2021

यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत २ लाख ३५ हजार हेक्टरवर हळदीची लागवड झाली आहे. सोयाबीनला उच्चांकी दर मिळाला आहे.

सांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत २ लाख ३५ हजार हेक्टरवर हळदीची लागवड झाली आहे. सोयाबीनला उच्चांकी दर मिळाला आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी सोयाबीन लागवडीकडे वळाला आहे. त्यामुळे देशातील हळदीच्या लागवडीच्या क्षेत्रात ५ ते १० टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

देशात दरवर्षी सरासरी २.६० लाख हेक्टरवर हळदीची लागवड होते. दोन वर्षापूर्वी पावसाने दडी मारल्याने त्याचा परिणाम हळद लागवडीवर झाला होता. त्यामुळे २.३० लाख हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा सर्वत्र उन्हाळी पाऊस वेळेत सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना हळद लागवडीचे नियोजन करून लागवड देखील केली आहे. 

गेल्यावर्षी देशात सुमारे २.६० लाख हेक्टरवर हळदीची लागवड झाली होती. दरम्यान, अति पाऊस यामुळे उत्पादनात घट झाली होती. त्यातच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हळद आरोग्यास उपयुक्त असल्याने हळदीच्या मागणीत वाढ झाली होती. त्यामुळे हळदीचे दर सुरुवातीपासूनच अपेक्षित मिळाले. वास्तविक पाहता, गतवर्षीच्या तुलनेत यंदा हळदीला प्रति क्विंटल १००० ते १५०० रुपयांनी अधिक दर मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परंतु यंदाही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांना हळद विक्रीस अडचणी निर्माण झाल्या. मात्र, दोन महिन्याच्या कालावधीनंतर बाजार सुरू झाले तरी, दराला झळाळी होती. मात्र, सोयाबीनला मिळालेल्या उच्चांकी दरामुळे हळद लागवड करणारे शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले असल्याने हळदीच्या क्षेत्रात घट होईल. 

याबाबत सांगली येथील हळद व्यापारी मनोहर सारडा म्हणाले की, गेल्यावर्षीपेक्षा यंदा हळदीच्या दरात तेजी होती. परंतु सोयाबीनला उचांकी दर मिळाल्याने हळद करणारे शेतकरी सोयाबीनकडे वळाले आहेत. लागवडीत ५ ते १० टक्के घट होईल, असा अंदाज आहे. 

सोयाबीन पिकाकडे कल
सोयाबीनला ७ हजार ते ८ हजार ५ पाचशे प्रतिक्विंटल असा दर मिळाला. आत्तापर्यंत सोयाबीनला असा दर मिळाला नव्हता. हा उच्चांकी दर असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. त्यामुळे हळद उत्पादन घेणारे शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळाले आहेत.

गेल्यावर्षी हळदीला चांगली मागणी होती. त्यामुळे दर ही चांगले मिळाले. परिणामी शेतकरी हळद लागवडीकडे वळाले आहेत. यंदा देशात हळदीच्या क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज आहे.
- डॉ. मनोज माळी,  प्रभारी अधिकारी, 
हळद संशोधन केंद्र, कसबेडिग्रज


इतर अॅग्रोमनी
उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळाचे कार्यप्रत्येक ‘एफपीओ’चे संचालक मंडळ पाचपेक्षा कमी...
राज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझेकोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या...
भारतीय साखरेला थायलंडचे आव्हानकोल्हापूर : येत्या हंगामात साखरनिर्यातीसाठी...
जागतिक बाजारात साखर दरात घटकोल्हापूर : जगातील सर्वांत जास्त साखर उत्पादन...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
सोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के...नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि...
मोहरीतील तेजीची कारणे  वेगळीच ः विजय...नागपूर : बाजारात हमीभावापेक्षा मोहरीला जास्त दर...
प्रक्रियायुक्‍त खाद्यपदार्थांच्या...नवी दिल्ली : कोरोनाकाळात सर्वच क्षेत्रांना मोठ्या...
दुसऱ्या लाटेचा बासमती तांदळास फटका कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बासमती...
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...
इंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर...कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांत देशातून निर्यात...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
साखर निर्यातीचा ‘गोडवा’ वाढलाकोल्हापूर : केंद्राकडून साखर निर्यात धोरण जाहीर...
पाम तेल आयातीवर श्रीलंकेचा ‘सर्जिकल...कोलंबो : श्रीलंका सरकारने पाम तेलाच्या आयातीवर...
सोयाबीनची तेजी अबाधित पुणे ः यंदा सोयाबीच्या दरांमध्ये झालेली सुधारणा...
भारताकडून पिवळ्या वाटाण्याची आयात बंद पुणे ः युक्रेनमधून पिवळ्या वाटाण्याची आयात करणारा...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः यंदाचा बेदाणानिर्मितीचा हंगाम अंतिम...
हरभरा दरवाढीचे संकेतपुणे ः देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक...