Agriculture news in Marathi Turmeric exports declined by 11 per cent in August | Page 2 ||| Agrowon

हळद निर्यात ऑगस्टमध्ये ११ टक्क्यांनी घटली

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 सप्टेंबर 2021

देशात निर्यातयोग्य हळदीचा साठा उपलब्ध आहे. मात्र, निर्यातीसाठीचे दर वाढल्याने आयातदार देशांतून मागणी मंदावली आहे. परिणामी देशातून हळद निर्यात ऑगस्ट महिन्यात ११ टक्क्यांनी घटली आहे.

पुणे : देशात निर्यातयोग्य हळदीचा साठा उपलब्ध आहे. मात्र, निर्यातीसाठीचे दर वाढल्याने आयातदार देशांतून मागणी मंदावली आहे. परिणामी देशातून हळद निर्यात ऑगस्ट महिन्यात ११ टक्क्यांनी घटली आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये १३ हजार ८०० टन निर्यात झाली होती. तर यंदा १२ हजार २३० टन निर्यात झाल्याचे जाणकारांनी सांगितले. 

जागतिक पातळीवर भारत हळद उत्पादनात अग्रेसर आहे. देशातून हळदीची निर्यात नियमित होतच असते. मात्र, देशांतर्गत बाजारात दर सुधारल्याचा परिणाम निर्यातीवर होत आहे. देशव्यापी लॉकडाउन, अनेक देशांमध्ये थांबलेली निर्यात आणि कंटनेरची कमतरता, भाडेवाढ या वाहतुकीतील अडथळ्यांमुळे निर्यात प्रभावित झाली होती. नंतरच्या काळात निर्यात सुरळीत झाली. मात्र, निर्यात कमी गतीने होत आहे.

देशातील हळद लागवड जवळजवळ संपत आली आहे. गेल्या काही दिवसांत हळदीला बऱ्यापैकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी लागवड काही प्रमाणात वाढविल्याचे जाणकारांनी सांगितले. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यांत चांगली लागवड झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, महाराष्ट्रात हळद उत्पादक भागांत झालेल्या पावसाने पिकाला फटका बसला आहे. इतर राज्यांत पीक सामान्य आणि चांगले आहे. बाजारांत नव्या हळदीची आवक पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात होईल. तोपर्यंत असलेल्या साठ्यावर देशाला गरज भागवावी लागेल. त्यातच सणांचा कालावधी असल्याने दरही चांगले राहण्याची शक्यता आहे, असे जाणकारांनी सांगितले.

अशी झाली निर्यात
देशातून ऑगस्ट महिन्यात झालेल्या एकूण निर्यातीपैकी संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) सर्वाधिक २ हजार ४७२ टन निर्यात झाली. त्यानंतर बांगलादेशात २ हजार १२ टन निर्यात झाली. अमेरिकेत ७४८ टन, जर्मनी ६०० टन, इराक ४४२ टन, सऊदी अरब ५१२ टन, मलेशिया ४७३ टन, इराण ४१६ टन आणि ट्युनिशिया देशात ३४७ टन हळदीची निर्यात झाली.

निर्यात मूल्य
देशात हळदीचा वापर वाढल्याने दर बऱ्यापैकी टिकून आहेत. त्यामुळे निर्यातही महाग होत आहे. परिणामी आयात करणाऱ्या देशांतून मागणी प्रभावित होत असल्याचे जाणकारांनी सांगितले. निर्यातीसाठी युएईसाठी निर्यात ऑफर मूल्य ७५०० रुपये प्रतिक्विंटल होते. बांगलादेशसाठी ७३०० रुपये होते.

देशातील लागवड आणि परिस्थिती पाहता चांगले उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यातच सट्टेबाज आणि साठेबाज सक्रिय असल्याने दरही चांगले राहण्याची शक्यता आहे.
- राहुल चौहान, शेतीमाल बाजार विश्लेषक, दिल्ली


इतर अॅग्रोमनी
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
कापूस उत्पादक देशांमध्ये पुरवठा २०...जळगाव : जगात कापसाचा मोठा तुटवडा तयार होत आहे....
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
धनत्रयोदशीला जळगावात ३० किलो सोने विक्रीजळगाव : जळगावची केळी व अस्सल सोन्यासाठी सुवर्ण...
जगभरात कापसाचे दर चढेच राहतीलपुणे : जागतिक कापूस वापरात होणारी वाढ, कमी शिल्लक...
तुरीला हवा हमीभाव खरेदीचा आधारपुणे : पुढील महिन्यापासून नवीन तुरीची बाजारात आवक...
दिवाळीमुळे हळदीला उठावपुणे : दिवाळीमुळे हळदीच्या मागणीत वाढ झाली आहे....
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
खाद्यतेलाच्या दराऐवजी सोयाबीन दरात मोठी...पुणे : निवडणुका आणि सणांच्या पार्श्‍वभूमीवर...
मोदीजी, तुमच्यासारख्या व्यक्तीकडून ही...अहमदाबाद, गुजरात : खरिपातील तेलबिया बाजारात...
मागणीमुळे कापसाला यंदा दराची झळाळीपुणे : कोरोनानंतरच्या काळात वाढलेली मागणी आणि...
खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे मोहरीच्या...पुणे : खाद्यतेलाच्या वाढत्या दर आणि...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
भारतीय साखरेसाठी यंदा ‘फिलगुड’गेल्या महिन्याच्या कालावधीत साखर उद्योगासाठी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
‘एम’ अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील...पुणे ः देशपातळीवर कृषी निविष्ठा निर्मिती...
भारतात होणारी सोयापेंड निर्यात...पुणे : भारत सरकारने जणुकीय सुधारित सोयापेंड...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...