हिंगोलीत हळद ४८०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल

हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डावर शुक्रवारी (ता.५) हळदीची ४००० क्विंटल आवक झाली. हळदीला प्रतिक्विंटलला किमान ४८०० ते कमाल ५२०० रुपये दर मिळाले.
 Turmeric in Hingoli rate Rs. 4800 to 5200 per quintal
Turmeric in Hingoli rate Rs. 4800 to 5200 per quintal

हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डावर शुक्रवारी (ता.५) हळदीची ४००० क्विंटल आवक झाली. हळदीला प्रतिक्विंटलला किमान ४८०० ते कमाल ५२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

भूसार मार्केटमध्ये हरभऱ्याची ११०० क्विंटल आवक झाली. हरभऱ्याला प्रतिक्विंटल ३९०० ते ३९५० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.४) भूईमुगाची ४०० क्विंटल आवक होऊन भूईमुगाला प्रतिक्विंटलला ४६५० ते ५११५ रुपये दर मिळाले. तुरीची ३०० क्विंटल आवक होती. तुरीला प्रतिक्विंटलला ४८०० ते ५३०० रुपये दर मिळाले. 

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.४) हरभऱ्याची ४४ क्विंटल आवक होती. त्यास प्रतिक्विंटलला ३५५० ते ३७०० रुपये दर मिळाले. भूईमूगाची १८६ क्विंटल आवक होती. भूईमुगाला प्रतिक्विंटलला ४३५० ते ४८६५ रुपये दर मिळाले. सोयाबीनची १४६ क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटलला ३३०० ते ३५०० रुपये दर मिळाले.

हळदी (कांडी) ची १३०६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५००० ते ५४४५ रुपये दर मिळाले. हळद (गोळा) ची २३१ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ५२५० रुपये दर मिळाले.  हरभऱ्याला ३७०० रुपये दर 

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.४) हरभऱ्याची ६६ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला सरासरी ३७०० रुपये दर मिळाले. तुरीची (लाल) ७१ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४८०० ते ५००० रुपये दर मिळाले. तुरीची (पांढरी) १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला सरासरी ५०५० रुपये दर मिळाले. सोयाबीनची ५० क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटलला सरासरी ३२५० रुपये दर मिळाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com