हिंगोलीत हळद प्रतिक्विंटल ५००० ते ६००० रुपये

हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २६) हळदीची ४५०० क्विंटल आवक होती. हळदीला प्रतिक्विंटलला ५००० ते ६००० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
Turmeric in Hingoli Rs. 5000 to 6000 per quintal
Turmeric in Hingoli Rs. 5000 to 6000 per quintal

हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २६) हळदीची ४५०० क्विंटल आवक होती. हळदीला प्रतिक्विंटलला ५००० ते ६००० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार माल मार्केटमध्ये हरभऱ्याची ४०० क्विंटल आवक होती. हरभऱ्याला प्रतिक्विंटलला ४१०० ते ४३०० रुपये दर मिळाले. सोयाबीनची ९५ क्विंटल आवक होती.सोयाबीनला प्रतिक्विंटलला ३६०० ते ३९०० रुपये दर मिळाले. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २५) हळद (कांडी)ची १९०० क्विंटल आवक होती.

हळद (कांडी)ला प्रतिक्विटंलला ५९०० ते ६५०० रुपये दर मिळाले. हळद (गोळा)ची ५५८ क्विंटल आवक होती. हळद (गोळा)ला प्रतिक्विंटलला ५५०० ते ६३३५ रुपये दर मिळाले. हळद (तुकडा)ची १० क्विंटल आवक होती. हळद (तुकडा)ला प्रतिक्विंटलला ४९०० रुपये दर मिळाले.

तुरीची २ क्विंटल आवक होती. तुरीला प्रतिक्विंटलला ४९०० ते ५१०० रुपये दर मिळाले. हरभऱ्याची ५३ क्विंटल आवक होती. हरभऱ्याला प्रतिक्विंटलला ३९०० ते ४००० रुपये दर मिळाले. गव्हाची १२ क्विंटल आवक होती. गव्हाला प्रतिक्विंटलला १७१५ ते १७२० रुपये दर मिळाले.ज्वारीची क्विंटल आवक होती. ज्वारीला १४ प्रतिक्विंटलला १६५० रुपये दर मिळाले. भुईमूग शेंगांची ३२ क्विंटल आवक होती. भुईमूग शेंगाना प्रतिक्विंटलला ४६०० ते ५२०० रुपये दर मिळाले.

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. २४) हरभऱ्याची ३० क्विंटल आवक होती. हरभऱ्याला प्रतिक्विंटलला ३६०० ते ४००० रुपये दर मिळाले. तुरी (लाल)ची १४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०७५ ते ५१४५ रुपये दर मिळाले. तूर (पांढरी)ची १२ क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटलला ५०८० ते ५१५० रुपये दर मिळाले. सोयाबीनची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ३५५० ते ३६३५ रुपये दर मिळाले. गव्हाची ४५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विटंलला १७७५ ते २१७५ रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com