सांगली बाजार समितीत हळदीची आवक वाढली

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भावामुळे बाजारात काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या बाजारात नव्या हळदीची आवक वाढू लागली आहे.
Turmeric inflow increased in Sangli market committee
Turmeric inflow increased in Sangli market committee

सांगली ः  कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भावामुळे बाजारात काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या बाजारात नव्या हळदीची आवक वाढू लागली आहे. सध्या बाजारात २५ ते ३० हजार पोत्यांची आवक होत आहे. मंगळवारी (ता. ९) हळदीच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे ५०० रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

गेल्या आठवड्यात बाजारात हळदीला चांगली मागणी होती. त्यामुळे दरात २ ते अडीच हजारांनी वाढ झाली होती. बाजारात हळदीची आवक सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात दरात मोठी सुधारणा झाली. गेल्या दोन दिवसांत हळदीच्या दरात तेजी आल्याचे चित्र पाहायला मिळाले. हळदीच्या वाढत्या दराने चांगला परतावा मिळेल अशी चर्चा बाजारपेठेत शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली होती. मात्र हळदीच्या दरात वाढ झाल्याने काही प्रमाणात मागणी कमी झाली असल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले.

हळदीला दर चांगले मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हळद साठवणूक करण्याऐवजी विक्रीस काढली आहे. त्यामुळे दररोज २५ ते ३० हजार पोत्यांची आवक होऊ लागली आहे. हळदीच्या आवकीत वाढ झाल्याने दर काहीसे दबावात आले आहेत. सेलम कणी आणि मध्यम या दोन प्रतवारीमध्ये ५०० रुपयांनी दर कमी झाले, तर उच्च लकडी हळदीच्या दर २ हजारांनी घटले आहेत.

शेतकऱ्यांनी पॅनिक सेल टाळावा सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने बाजार बंद होईल अशी भीती निर्माण होत आहे. परंतु ही स्थिती जास्त काळ असण्याची शक्यता कमी आहे. भीतीमुळे आवक वाढल्यास दर आणखी दबावात येण्याची शक्यता आहे. हळदीला देशासह आंतरराष्ट्रीय बाजारातूनही मागणी आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती काही काळ असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘पॅनिक सेल’ टाळून टप्प्याटप्याने विक्री करावी, असे वाहन बाजारातील जाणकारांनी केले आहे.

गेल्या वर्षीपेक्षा यंदा हळदीला दर चांगले आहेत. परंतु गेल्या दोन दिवसांत दरात घसरण झाली असल्याचे इथे आल्यानंतर पाहिला मिळाले. याचे कारण म्हणजे बाजारात हळदीची आवक वाढली आणि दुसरे कारण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, यामुळे पुन्हा लॉकडाउन होतोय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे हळद विक्रीसाठी शेतकरी पुढे येऊ लागले आहेत. - जयसिंग साबळे, हळद उत्पादक, वडूथ, जि. सांगली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com