Agriculture news in Marathi Turmeric inflow increased in Sangli market committee | Page 4 ||| Agrowon

सांगली बाजार समितीत हळदीची आवक वाढली

टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 मार्च 2021

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भावामुळे बाजारात काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या बाजारात नव्या हळदीची आवक वाढू लागली आहे.

सांगली ः  कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भावामुळे बाजारात काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या बाजारात नव्या हळदीची आवक वाढू लागली आहे. सध्या बाजारात २५ ते ३० हजार पोत्यांची आवक होत आहे. मंगळवारी (ता. ९) हळदीच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे ५०० रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

गेल्या आठवड्यात बाजारात हळदीला चांगली मागणी होती. त्यामुळे दरात २ ते अडीच हजारांनी वाढ झाली होती. बाजारात हळदीची आवक सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात दरात मोठी सुधारणा झाली. गेल्या दोन दिवसांत हळदीच्या दरात तेजी आल्याचे चित्र पाहायला मिळाले. हळदीच्या वाढत्या दराने चांगला परतावा मिळेल अशी चर्चा बाजारपेठेत शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली होती. मात्र हळदीच्या दरात वाढ झाल्याने काही प्रमाणात मागणी कमी झाली असल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले.

हळदीला दर चांगले मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हळद साठवणूक करण्याऐवजी विक्रीस काढली आहे. त्यामुळे दररोज २५ ते ३० हजार पोत्यांची आवक होऊ लागली आहे. हळदीच्या आवकीत वाढ झाल्याने दर काहीसे दबावात आले आहेत. सेलम कणी आणि मध्यम या दोन प्रतवारीमध्ये ५०० रुपयांनी दर कमी झाले, तर उच्च लकडी हळदीच्या दर २ हजारांनी घटले आहेत.

शेतकऱ्यांनी पॅनिक सेल टाळावा
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने बाजार बंद होईल अशी भीती निर्माण होत आहे. परंतु ही स्थिती जास्त काळ असण्याची शक्यता कमी आहे. भीतीमुळे आवक वाढल्यास दर आणखी दबावात येण्याची शक्यता आहे. हळदीला देशासह आंतरराष्ट्रीय बाजारातूनही मागणी आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती काही काळ असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘पॅनिक सेल’ टाळून टप्प्याटप्याने विक्री करावी, असे वाहन बाजारातील जाणकारांनी केले आहे.

गेल्या वर्षीपेक्षा यंदा हळदीला दर चांगले आहेत. परंतु गेल्या दोन दिवसांत दरात घसरण झाली असल्याचे इथे आल्यानंतर पाहिला मिळाले. याचे कारण म्हणजे बाजारात हळदीची आवक वाढली आणि दुसरे कारण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, यामुळे पुन्हा लॉकडाउन होतोय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे हळद विक्रीसाठी शेतकरी पुढे येऊ लागले आहेत.
- जयसिंग साबळे, हळद उत्पादक, वडूथ, जि. सांगली.


इतर अॅग्रोमनी
खाद्य तेलाच्या किमती आटोक्यात आणणार :...नवी दिल्ली : देशातील खाद्य तेलाच्या किरकोळ...
अन्नप्रक्रिया उद्योगासाठी १०,९००...नवी दिल्ली : देशातील अन्नप्रक्रिया उद्योगासाठी (...
सांगली बाजारात हळदीचे दर स्थिर सांगली ः गेल्या आठवड्यापासून हळदीचे दर स्थिर असून...
चीनच्या मागणीने शेंगदाणा दराला आधार पुणे : शेंगदाण्याची बाजारात गेल्या वर्षीच्या...
राज्यात शिल्लक साखरेचा बोजा कायम कोल्हापूर : यंदाचा साखर हंगाम अंतिम टप्प्यात येत...
लातूरला सोयाबीनचा भाव साडे पाच हजारावरलातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
हळदीच्या आवकेत वाढसांगली ः हळदीचा हंगाम सुरु झाल्यापासून सहा ते...
तूर आयातीचा परिणाम दीर्घकाळ कमीच राहील पुणे ः सरकारने वित्तीय वर्ष २०२१-२२ साठी ६ लाख टन...
राज्यातून २० लाख टन साखरनिर्यातीचे करार कोल्हापूर ः यंदा साखर उत्पादनाबरोबरच...
आयातीने तुरीच्या दरावर परिणाम शक्य पुणे ः उडीद आयातीला गेल्या आठवड्यात परवानगी...
आवक वाढूनही हरभरा दर टिकून पुणे ः यंदा हरभरा उत्पादनात घटीचा अंदाज आणि सण...
देशातील कापूस उत्पादन ३५८ लाख गाठींवर...नवी दिल्ली ः देशात यापूर्वी कापसाचे ३६० लाख गाठी...
मोहरीला दराचा ‘तडका’ पुणे ः राजस्थानमध्ये मोहरीच्या दराने हमीभावाचा...
हळदीची आवक वाढू लागली सांगली/परभणी ः बाजार समित्यांत हळदीची आवक वाढू...
देशात विक्रमी फलोत्पादनाचा अंदाज पुणे ः देशात २०२०-२१ मध्ये फलोत्पादनात फळांचे १०३...
चीनकडून शेतीमालाची आक्रमक खरेदी पुणे ः जागतिक पातळीवर जवळपास सर्वच शेतमालाची...
हरभरा दरात घसरणीची शक्यता कमीपुणे ः हरभरा आवक वाढत असून पुढील १० ते १२ दिवसांत...
तेलबिया उत्पादनात वाढ वॉशिंग्टन ः जागतिक तेलबिया उत्पादनात फेब्रुवारी...
सांगली बाजार समितीत हळदीची आवक वाढलीसांगली ः  कोरोना विषाणूचा वाढता...
सरकारी आकड्यांपेक्षा हरभरा उत्पादनात घट यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच पिकांना बदलत्या...