Agriculture news in marathi Turmeric, jaggery traded in Sangli postponed | Agrowon

सांगलीत हळद, गूळाचे सौदे लांबणीवर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 एप्रिल 2020

सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद व गूळाचे सौदे मंगळवार (ता. २१) पासून सुरू होणार होते. परंतु सांगलीत ‘कोरोना’चा पहिला बळी गेल्यामुळे सौदे लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती सभापती दिनकर पाटील यांनी दिली. तसेच मार्केट यार्डातील सर्व हमाल सोमवार (ता. २०) पासून काम बंद ठेवणार असल्याचेही हमाल पंचायतीचे विकास मगदूम यांनी सांगितले आहे. 

सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद व गूळाचे सौदे मंगळवार (ता. २१) पासून सुरू होणार होते. परंतु सांगलीत ‘कोरोना’चा पहिला बळी गेल्यामुळे सौदे लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती सभापती दिनकर पाटील यांनी दिली. तसेच मार्केट यार्डातील सर्व हमाल सोमवार (ता. २०) पासून काम बंद ठेवणार असल्याचेही हमाल पंचायतीचे विकास मगदूम यांनी सांगितले आहे. 

‘कोरोना’मुळे लॉकडाऊनचा दुसरा टप्पा वाढवताना सरकारने कृषी आणि उद्योग व्यवसायात शिथिलता आणण्याचे जाहीर केले होते. त्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सांगलीत बाजार समितीमध्ये गूळ व हळदीचे सौदे सुरू करण्यात येणार असल्याचे सभापती श्री. पाटील यांनी जाहीर केले होते. सध्या लॉकडाऊनमुळे बाजार समितीची रोजची २५ कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे. शेतकरी, व्यापारी आणि हमाल आदींवर आर्थिक संकट आले आहे. मार्केट यार्डात केवळ होलसेल किराणा दुकाने सुरूच आहेत. 

केंद्र सरकारच्या सूचनानुसार मंगळवार (ता. २१) पासून गुळाचे सौदे काढण्यात येणार होते. त्यासाठी बाजार समिती व व्यापारी आदींनी नियोजन केले होते. त्याचदिवशी हळदीच्या सौद्याबाबत तारीख निश्‍चित करण्यात येणार होती. परंतु सांगलीत ‘कोरोना’चा पहिला बळी गेल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर हळद व गुळाचे सौदे पुन्हा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्याचे सभापती श्री. पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान मार्केट यार्डातील सर्व हमालांनी देखील सोमवार (ता. २०) पासून हमाली बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील सूचना येईपर्यंत यार्डातील हमाल कामावर येणार नाहीत. हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम यांनी ही माहिती दिली. त्यामुळे ग्रामीण भागातून मार्केट यार्डात होलसेल किराणा मालासाठी येणाऱ्या दुकानदारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.


इतर बाजारभाव बातम्या
खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात जळगाव : खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात आले आहेत...
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या खरेदीदारांकडून...हिंगोली : जिल्ह्यातील बाजार समित्यांतील हळदीच्या...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
भेंडीची तोडणी सूरू, पुरवठाही वाढला..(...नाशिक : बागायती भागातून वाढलेला पुरवठा आणि...
कोल्हापुरात फळांची आवक घटलेलीचकोल्हापूर : बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत सुरू...
खानदेशात मका, गव्हाच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात मका व गव्हाच्या दरात सुधारणा होत...
पुरवठा साखळी प्रभावित झाल्याने...सातारा  ः ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी सुरू...
खानदेशात कडब्याचे दर दबावात जळगाव  ः खानदेशात ज्वारी, मका, बाजरीच्या...
राहुरीत कांदा लिलाव सुरु, पण आवक, दर...राहुरी, जि. नगर : लॉकडाउनमुळे तब्बल दोन...
खानदेशात शिवार खरेदीत मक्याला १३००...जळगाव : खानदेशातील बाजारांत या आठवड्यात मक्‍याची...
अमरावती महापालिका हद्दीत ‘फार्म टू होम...अमरावती ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तासगावला बेदाण्याचे सौदे प्रायोगिक...सांगली ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २२ मार्च पासून...
औरंगाबादमध्ये ज्वारी १८०० ते २०२५ रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
लातूर जिल्ह्यात १२ केंद्रांवर १ लाख २१...लातूर : जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रांवरून...
मुंबई बाजार समितीत भाजीपाल्याची आवक...मुंबई : मुंबई बाजार समितीत कोरोनाग्रस्त...
रत्नागिरी बाजार समितीत आंब्याची अडीच...रत्नागिरी ः कोरोनाविषयक संचारबंदीमुळे अडचणीत...
औरंगाबाधमध्ये हिरवी मिरची १००० ते १६००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादमध्ये मोसंबी ६०० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
केळी दरात सुधारणा, परराज्यात पाठवणी...जळगाव ः केळी दरात मागील दोन-तीन दिवसांत चांगली...
नांदेड बाजार समितीत नवीन हळदीची आवक नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...