नांदेडमध्ये हळद ४९०० ते ५७०० रूपये प्रतिक्विंटल

नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१३) हळदीची १००० क्विंटल आवक होती. हळदीला प्रतिक्विंटलला किमान ४९००, तर कमाल ५७०० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
Turmeric in Nanded rate is 4900 to 5700 per quintal
Turmeric in Nanded rate is 4900 to 5700 per quintal

नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१३) हळदीची १००० क्विंटल आवक होती. हळदीला प्रतिक्विंटलला किमान ४९००, तर कमाल ५७०० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

हरभऱ्याची २५ क्विंटल आवक होती. हरभऱ्याला प्रतिक्विंटलला किमान ३७००, तर कमाल ४००० रुपये दर मिळाले. गव्हाची २५ क्विंटल आवक होती. गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी १७०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.१३) जिंतूर (जि.परभणी) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची ६९८ क्विंटल आवक होती. हळदीला प्रतिक्विंटल किमान ४४०० रुपये, तर कमाल  ५५९५ रुपये, सरासरी ५१०० रुपये दर मिळाले.

तूरीची (लाल) २३ क्विंटल आवक होती. तुरीला प्रतिक्विंटल किमान ५४०० रुपये, कमाल ५६०० रुपये, तर सरासरी ५४५६ रुपये दर मिळाले. सोयाबीनची १८५ क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ३४५० रुपये, कमाल ३६२० रुपये, तर सरासरी ३५०० रुपये दर मिळाले. गंगाखेड (जि.परभणी) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१३) सोयाबीनची २० क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटलला किमान ३६५० रुपये, कमाल ३७०० रुपये, तर सरासरी ३६८० रुपये दर मिळाले. तुरीची १० क्विंटल आवक झाली. तुरीला प्रतिक्विंटलला किमान ५००० रुपये, कमाल ५२०० रुपये तर सरासरी ५१५० रुपये दर मिळाले. 

ज्वारीला १९०० ते २२५० रूपये

ज्वारीची (संकरित) १२ क्विंटल आवक झाली. ज्वारीला प्रतिक्विंटलला किमान १९००, कमाल २२५० रुपये, तर सरासरी २१०० रुपये दर मिळाले. ज्वारीची (पांढरी) १४ क्विंटल आवक होती. ज्वारीला प्रतिक्विंटलला किमान २१५० रुपये, कमाल २४५० रुपये, तर सरासरी २३०० रुपये दर मिळाले. गव्हाची ८ क्विंटल आवक होती. गव्हाला प्रतिक्विंटलला किमान १७५० रुपये, कमाल १९०० रुपये तर सरासरी १८५० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com