Agriculture News in Marathi Turmeric prices stable | Agrowon

हळदीचे दर स्थिर 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 डिसेंबर 2021

सध्या देशभरात देशात हळदीची ३७ लाख पोती शिल्लक आहेत, तरीही हळदीचे दर स्थिर असून, प्रति क्विंटल ५ ते ८ हजार रुपये, असा दर मिळत आहे.

सांगली ः सध्या देशभरात देशात हळदीची ३७ लाख पोती शिल्लक आहेत, तरीही हळदीचे दर स्थिर असून, प्रति क्विंटल ५ ते ८ हजार रुपये, असा दर मिळत आहे. हळदीची निर्यात देखील चांगली होत आहे. हळद उत्पादन घेणाऱ्या भागांत अतिवृष्टी झाल्याने यंदा देशात हळदीच्या उत्पादनात १० टक्क्यांनी घट होण्याचा प्राथमिक अंदाज हळद उद्योगातील जाणकांनी व्यक्त केला आहे. 

देशात दर वर्षी ८० ते ९० लाख पोती (एक पोते ५० किलोचे) हळदीचे उत्पादन होते. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून नव्या हळदीच्या काढणीस प्रारंभ होईल. गेल्या वर्षभरापासून देश आणि परदेशात हळदीची मागणी वाढली आहे. त्यामुळे हळदीचा अपेक्षित उठाव झाला आहे. सध्या व्यापारी आणि शेतकऱ्यांकडे हळदीची ३७ लाख पोती शिल्लक आहेत. गत वर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्याअखेर ३५ लाख पोती शिल्लक होती.

वास्तविक पाहता यंदा दोन लाख पोती अधिक शिल्लक आहेत. डिसेंबर ते फेब्रुवारी अखेर शिल्लक राहिलेल्या हळदीची विक्री मोठ्या प्रमाणात होईल, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे. अर्थात, या तीन महिन्यांत सुमारे १२ ते १५ लाख पोत्यांची विक्री होईल. म्हणजे २२ ते २५ लाख पोती जुन्या हळदीची पोती शिल्लक राहतील. फेब्रुवारी महिन्यात नव्या हळदीची आवक होण्यास प्रारंभ होईल. त्यामुळे नव्या आणि जुन्या हळदीचा उठावदेखील होईल. त्यामुळे जुनी हळद शिल्लक राहणार नाही. 

देशातील हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यात गेल्या दोन महिन्यांत अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचा फटका हळद पिकास बसला असल्याने हळदीच्या उत्पादनात १० टक्क्यांनी घट होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. जरी उत्पादन घट झाली तरी, हळदीच्या दरात फारशी तेजी-मंदी होण्याची शक्यता नाही. देशांतगर्त आणि परदेशात हळदीची मागणी वाढत असल्याने हळदीचे दर टिकून राहतील. 

दररोज १०० ते १५० टन हळदीची होते निर्यात 
युरोपसह बांगलादेश आणि आखाती परदेशात हळदीची मागणी वाढली आहे. त्यामुळे देशातून दररोज १०० ते १५० टन हळदीची निर्यात होत आहे. निर्यातीच्या हळदीला प्रति क्विंटल ७७०० ते ७९०० रुपये असा दर मिळत आहे. त्यामुळे निर्यात देखील वाढण्याची शक्यता आहे. 

प्रतिक्रिया 
देशात सद्यःस्थितीला ३७ लाख पोती शिल्लक असली, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हळदीचे दर टिकून आहेत. हळदीची मागणी देखील वाढली आहे. निर्यातीत देखील वाढ झाली आहे. त्यामुळे हळदीच्या दरात फारशी तेजी-मंदी होण्याची चिन्हे नाहीत. 
मनोहर सारडा, हळद व्यापारी, सांगली  


इतर अॅग्रो विशेष
राज्यात हिरवी मिरची १२०० ते ६५०० रुपयेपरभणीत ४००० ते ६५०० रुपये परभणी ः येथील पाथरी...
जादा दराने खतांची विक्री सात...नाशिक : रब्बी हंगामात शेतकऱ्यांची खतांना मागणी...
महाराष्ट्रात ३५ धान्य आधारित इथेनॉल...वृत्तसेवा - केंद्र सरकारने (Central Government)...
रशियासाठी निर्यातीच्या द्राक्ष दराचा...पुणे - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने...
गावरान कि ब्रॉयलर चवीला कोण जबरदस्त?कोंबडीची पचनसंस्था कशी कार्य करते. तुम्ही कोंबडी...
थंडीत खा अंडी रोज सकाळी उठल्यावर कसला नाष्टा करावा जो कि...
गुणवत्तापूर्ण आंब्याला मिळवली ग्राहक...मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) येथील विद्याधर...
ट्रायकोडर्मा निर्मितीसाठी शेतात उभारली...राहुल रसाळ यांनी शेत परिसरात छोटेखानी प्रयोगशाळा...
टिळा तेजाचामराठी भाषेला मातीतल्या कवितेचे लेणं चढवणाऱ्या कवी...
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
सहकाराला मारक कायदे बदलण्याला प्राधान्य राज्यातील सहकारी बॅंकिंग व्यवस्थेचे अभ्यासक...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
‘जुनं ते सोनं' चा खोटेपणा "जुनी शेती खूप चांगली होती. त्या शेतीत खूप...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...