यवतमाळ बाजार समितीत हळद खरेदीस प्रारंभ

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

यवतमाळ  ः जिल्ह्यात हळदीखालील क्षेत्रात वाढ होत असल्याने बाजार समितीने हळद उत्पादकांसाठी स्थानिक स्तरावर हळद खरेदीचा निर्णय घेतला असून, शनिवारपासून (ता. २५) हळद खरेदीला सुरवात झाली आहे. बाजार समितीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे हळद विक्रीसाठी मराठवाड्यात जाण्याचे श्रम वाचणार आहेत.

कापूस उत्पादकतेमुळे कॉटन सिटी अशी यवतमाळची ओळख. जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक साडेचार लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड होते. नजीकच्या काळात जिल्ह्यात प्रयोगशीलतेलादेखील चालना मिळत नवनव्या पिकांसाठी शेतकरी पुढाकार घेऊ लागले आहेत. त्यामध्ये हळद पिकाचाही समावेश आहे. हळदीखालील क्षेत्र वाढत असतानाच विक्रीची सोय मात्र नव्हती. हळद विक्रीसाठी शेतकऱ्यांना हिंगोली, वसमत या ठिकाणी आपला माल न्यावा लागत होता. यात वाहतूक खर्च आणि वेळ, श्रमही मोठ्या प्रमाणात खर्ची होत होते. यवतमाळ बाजार समितीने हळद उत्पादकांची मागणी लक्षात घेत स्थानिक स्तरावरच बाजारपेठ उपलब्धतेचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारपासून (ता. २५) बाजार समितीत हळद खरेदीला सुरवात झाली. 

हिंगणघाट आणि यवतमाळचे व्यापारी हळद खरेदी करणार आहे. अडतविना खरेदी आणि तत्काळ चुकाऱ्याची सेवा शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे. शनिवारी (ता. २५) पहिल्याच दिवशी ५००० ते ६३०० रुपये क्‍विंटल दराने हळदीचे व्यवहार झाले. यावेळी हळद घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा शेला, नारळ देत गौरव करण्यात आला. बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक, उपसभापती गजानन डोमाळे, संचालक रमेश बिसनकर, सुरेश पात्रिकर, किशोर बढे, अशोक शिर्के, विजय मुंधडा, किशोर इंगळे, राजू निमोदिया, सचिव विजय वाढई या वेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com