agriculture news in marathi Turmeric purchase from big buyers stopped in Hingoli district | Agrowon

हिंगोली जिल्ह्यात मोठ्या खरेदीदारांकडून हळद खरेदी बंद

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मे 2020

हळद मार्केटमध्ये दररोज दोन ते अडीच हजार क्विंटल हळदीची आवक होत आहे. परंतु, मोठ्या खरेदीदारांकडून मागणी 
नाही. त्यामुळे दर चार हजार रुपयापर्यंत कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. 
- एस. एन. शिंदे, सचिव, बाजार समिती, वसमत, जि. हिंगोली. 

हळद उत्पादन, गुणवत्तेत वाढ झाली. परंतु, यंदा लॉकडाऊनमुळे हळदीवर आधारित कारखाने बंद राहिले. मागणी कमी झाल्यामुळे ऐन हंगामात दरात घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित झाले आहेत. 
- प्रल्हाद बोरगड, अध्यक्ष, सूर्या शेतकरी उत्पादक कंपनी,  सातेफळ,जि.हिंगोली. 

हिंगोली : जिल्ह्यातील बाजार समित्यांतील हळदीच्या दरात घसरण सुरु आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी चितिंत आहेत. लॉकडाउनमुळे मोठ्या खरेदीदारांकडून खरेदी बंद आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरेदी हंगामात हळदीच्या दरात दोन ते अडीच हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा होत आहे. 

तुलनेने कमी पाण्यात किफायतीशर उत्पादन मिळत असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर हळद लागवडीकडे वळले आहेत. दरवर्षी हळद लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत आहे. गतवर्षी जिल्ह्यात ३६ हजार २९९ हेक्टरवर लागवड झाली होती. लागवडीच्या सुधारित पध्दती तसेच काटेकोर पीक व्यवस्थापनामुळे हळदीच्या क्षेत्रातसोबतच एकरी उत्पादकता सरासरी २० क्विंटलपर्यंत वाढली आहे. 

जिल्ह्यात हिंगोली, वसमत, जवळा बाजार, सेनगाव आदी बाजार समित्यांतंर्गंत हळद मार्केट विकसित झाले आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या हळद खरेदी करत आहेत. यंदा लॉकडाऊनमुळे मसाले, औषधी, सौंदर्य प्रसाधने आदींचे कारखाने बंद राहिले. मोठ्या खरेदीदारांकडून हळदीला मागणी नाही. सध्या हळद मार्केटमध्ये दररोज हजारो क्विंटल हळदीची आवक होत आहे.

एप्रिल महिन्यापासून दरात घसरण सुरु आहे. सध्या प्रतिक्विंटलला ४ ते ५ हजार रुपये दर मिळत आहेत. गतवर्षीच्या हंगामात सरासरी ६ हजार ते ७ हजार रुपयापर्यंत दर मिळाले होते. उत्पादकांना नुकसान सोसावे लागत आहे. 

 


इतर ताज्या घडामोडी
पेरणीसाठी ‘बीबीएफ’ तंत्राचा वापर करा :...औरंगाबाद : ‘‘बीबीएफ टोकण यंत्राचा वापर वेगवेगळी...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंका पीक...जळगाव ः केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
हतनूर धरणाची साठवण क्षमता घटलीभुसावळ, जि. जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख सिंचन...
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा...जालना  : ‘‘शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिक...
रिसोड बाजार समितीत हळदीची दोन दिवस खरेदीअकोला ः गेल्या काही वर्षांत वाशीम तसेच अकोला...
खानदेशात सर्वदूर पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात पेरणी ८८ टक्‍क्‍यांवर पोचली असून...
परभणीत २५ हजारांवर शेतकऱ्यांची कापूस...परभणी  : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
रत्नागिरी जिल्ह्यातील भाजीपाला,...रत्नागिरी : कोरोना टाळेबंदीत जिल्ह्यातील महिला...
सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पेरणी वाया...सांगली : जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून...
नगर जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर पेरानगर ः यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्रांमध्ये...
परभणी जिल्ह्यात ७४.४३ टक्के पेरणीपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवार...
अकोला जिल्ह्यात पीक कर्जापासून ५२ टक्के...अकोला ः खरीप हंगामाला सुरुवात झाली असून,...
पाऊस नसल्याने संरक्षित पाण्यावर भातलागवडनाशिक : जिल्ह्यातील अतिपर्जन्य छायेखालील इगतपुरी...
बियाणे भरपाई दिलेल्या शेतकऱ्यांची नावे...नागपूर ः आपल्या सत्ताकाळात निकृष्ट बीटी...
जळगाव, धुळ्यात युरियाची टंचाई कायमधुळे ः जळगाव व धुळे जिल्ह्यांत युरियासह १०.२६.२६...
महाजॉब्स संकेतस्थळाच्या माध्यमातून...मुंबई : देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा सेंटर असो की...
केंद्राकडून शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पाय...कऱ्हाड, जि. सातारा ः अर्थव्यवस्थेला शेतकरी राजा...
करमाळ्यातील आदिनाथ कारखाना...करमाळा, जि. सोलापूर : करमाळा तालुक्‍यातील आदिनाथ...
हॉटेल्स, लॉज उद्यापासून सुरू होणारमुंबई : तब्बल साडेतीन महिन्यांनंतर ८ जुलैपासून...
जनहितचे धरणे अन् तत्काळ शेतकऱ्यांच्या...सोलापूर  ः मोहोळ तालुक्यातील ऑक्टोबर -...