agriculture news in Marathi turmeric rate up in country Maharashtra | Agrowon

हळदीला दराचा ‘रंग’ 

अनिल जाधव
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

हळद उत्पादनात घट झाल्याने यंदा हळदीचे दर वाढलेले आहेत. सध्या हळदीला देशभरात सरासरी ६६०० ते ९५०० रुपये दर मिळत आहेत. हे दर गेल्या वर्षातील उच्चांकी आहेत.

पुणे ः हळद उत्पादनात घट झाल्याने यंदा हळदीचे दर वाढलेले आहेत. सध्या हळदीला देशभरात सरासरी ६६०० ते ९५०० रुपये दर मिळत आहेत. हे दर गेल्या वर्षातील उच्चांकी आहेत. देशांतर्गत मागणी आणि निर्यातीसाठी विचारणा होत असल्याने यंदा हळदीचे दर चांगले राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

‘‘सांगली बाजार समितीत नवीन हळदीची १८ ते २० हजार पोती आवक होत आहे. पुढील आठवड्यापासून आवक वाढण्याची शक्यता आहे. उत्पादनात ५ ते १० टक्के घट होण्याचा अंदाज आहे. सध्या बाजारात पावडर गुणवत्तेच्या हळदीला ७५०० ते ८२०० रुपये दर आहे. मीडियम रास मालाला ८२०० ते८५०० रुपये राजापुरी हळदीला ८५०० ते ९००० रुपये दर मिळत आहे. सध्याचे दर हे गेल्या पाच वर्षांतील विक्रमी दर आहेत.

मागणी आणि पुरवठ्यात तूट असल्याने दर वाढलेले आहेत. बाजारात आवक वाढली आणि सर्वच खेरदी केंद्रे सुरू झाल्यानंतर दर काही प्रमाणात तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार पाहून विक्री करावी,’’ असे आवाहन हळद व्यापारी हार्दिक सारडा यांनी केले. 

‘‘तेलंगणातील हळदीसाठी महत्त्वाच्या असलेल्या निजामाबाद बाजारात सरासरी ३० ते ३५ हजार पोत्यांची (एक पोते ६० किलो) आवक होत आहे. मागील दोन ते तीन दिवसांत दरात ३०० ते ४०० रुपये वाढ झाली आहे. सध्या हळद दराने मागील पाच वर्षांतील उच्चांक गाठला आहे. आम्हाला दुबईतून हळदीसाठी मागणी आली आहे. परंतु बाजारात आवक जेमतेम आहे. हळदीचे दर विक्रमी पातळीवर असतानाही आवक वाढताना दिसत नाही. याचा अर्थ सरळ आहे की यंदा उत्पादनात मोठी घट आहे. आमच्या अंदाजानुसार तेलंगणा आणि परिसरात उत्पादनात २५ टक्क्यांच्या जवळपास उत्पादनात घटीचा अंदाज आहे. त्यामुळे बाजारात आवक वाढताना दिसत नाही. मागणी आहे परंतु पुरवठा कमी असल्याने दर वाढत आहेत,’’ अशी माहिती निजामाबाद येथील व्यापारी सूत्रांनी सांगितले. 

विक्रमी दर केवळ दाखविण्यासाठी 
राज्यात केवळ सांगली बाजार समितीत नव्या हळदीची आवक आहे. येथे मागील दोन दिवसांपासून हळदीला २० हजार ते २४ हजार १०० रुपये विक्रमी दर मिळत असल्याचे वृत्त येत आहे. मात्र हे दर केवळ एक किंवा दोन क्विंटलच्याच मालाला मिळाले आहेत. हळदीचे दर बाजारात खूपच वाढलेले आहेत, हे ग्राहकांना दाखविण्यासाठी ही बोली लावली जाते. त्यामुळे विक्रमी दर हे केवळ दाखविण्यापुरतेच आहेत, सूत्रांनी सांगितले. 

प्रतिक्रिया
हळद उत्पादनातील घटीमुळे दरात वाढ झाली आहे. आम्हाला दुबई येथील बाजारातून हळदीसाठी विचारणा झाली आहे. परंतु बाजारात आवक कमी आहे. बाजारात ७६६० ते ७७७० रुपये दर मिळत आहेत. यंदा हळदीचे दर चांगले राहतील. 
- सुभम झावर, हळद व्यापारी, निजामाबाद, तेलंगणा 

सध्या हळदीचे दर पाच वर्षांतील विक्रमी पातळीवर आहेत. बाजारात आवक कमी असून, मागणी अधिक असल्याने दरात मोठी सुधारणा झाली आहे. शेतकऱ्यांनी बाजाराचा विचार करून विक्री करावी. 
- हार्दिक सारडा, हळद व्यापारी, सांगली 


इतर अॅग्रोमनी
भारतात होणारी सोयापेंड निर्यात...पुणे : भारत सरकारने जणुकीय सुधारित सोयापेंड...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना...पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या...
तूर, उडीद आयात कालावधी वाढविल्याचा होईल...पुणे : केंद्र सरकारने तूर आणि उडीद आयातीसाठीचा...
हळद निर्यात ऑगस्टमध्ये ११ टक्क्यांनी...पुणे : देशात निर्यातयोग्य हळदीचा साठा उपलब्ध आहे...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
केंद्राच्या निर्य़ातीनंतर सोयाबीनच्या...पुणे : केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात...
केंद्र सरकारकडून खाद्यतेल आयात शुल्कात...नवी दिल्ली ः देशात खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीवर...
वाढत्या मागणीने हरभरा दरात सुधारणापुणे : साठेबाज, व्यापारी आणि मिलर्सवर असलेली...
तूर, मूग, उडीद आयातीची प्रक्रिया सुरू;...पुणे : केंद्र सरकारने पंचवार्षिक करार करून...
रब्बीचे हमीभाव जाहीर : गव्हात ४०; हरभरा...नवी दिल्ली : केंद्र सरकारने रबी हंगामासाठी...
उडीद दरात सुधारणेची चिन्हेपुणे ः गेल्या हंगामात देशात उडदाचे उत्पादन कमी...
बेदाणा दरात प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांची...सांगली : अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यामुळे...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करावी...नागपूर : एफआरपीत वाढ झाली असतानाच साखरेच्या...
सोयाबीन दराची पुन्हा दहा हजारी; दर...पुणे ः गेल्या सप्ताहात सोयाबीन दरात मोठी सुधारणा...
कडधान्याचे गणित पावसावरच अवलंबूनमुंबई : देशात यंदा मॅान्सूनची सुरुवात चांगली झाली...