agriculture news in Marathi turmeric rate stable in Sangali Maharashtra | Page 2 ||| Agrowon

सांगली बाजारात हळदीचे दर स्थिर 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 मार्च 2021

गेल्या आठवड्यापासून हळदीचे दर स्थिर असून, हळदीच्या दरात १०० ते २०० रुपयांचा चढ-उतार होत आहे. आतापर्यंत हळदीचा हंगाम ६० टक्के पूर्ण झाला आहे, अशी माहिती हळद व्यापाऱ्यांनी दिली.

सांगली ः गेल्या आठवड्यापासून हळदीचे दर स्थिर असून, हळदीच्या दरात १०० ते २०० रुपयांचा चढ-उतार होत आहे. आतापर्यंत हळदीचा हंगाम ६० टक्के पूर्ण झाला आहे, अशी माहिती हळद व्यापाऱ्यांनी दिली. सांगलीच्या हळद बाजार मेअखेर सुरू राहील, असा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

सांगली बाजार समितीत हळदीचा बाजार वाढू लागला आहे. हळदीचा बाजार प्रामुख्याने जानेवारी महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत सुरू राहतो. या दरम्यान, सांगलीसह परराज्यातील हळद विक्रीला येते. बाजार समितीत दररोज २५ हजार ते ३० हजार क्विंटल हळदीची आवक होत आहे. यंदा देशात हळदीच्या उत्पादनात २० टक्क्यांनी घट होईल, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला असून, यंदा सुमारे ८० लाख पोत्यांचे उत्पादन होईल. सध्या देशातील बाजारपेठेत हळदीची विक्री सुरू आहे.

फेब्रुवारी महिन्यात हळदीची काढणी झाली होती. शेतकऱ्यांनी हळद शिजवून वाळण्यासाठी टाकली होती. त्याच दरम्यान, बहुतांश ठिकाणी पाऊस झाला होता. तसेच दरही पडले होते. त्याचा फटका हळदीला बसला आहे. काही ठिकाणी हळद लाल होण्याचे प्रकार झाले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम दरावरही झाला आहे. परंतु आतापर्यंत किती पोत्यांची विक्री झाली आहे, हे आताच सांगता येणार नाही, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले. 

पावडरला मोठी मागणी 
निजामाबादहून हळदीची निर्यात सुरू आहे. निर्यातक्षम हळदीचा दर प्रति क्विंटल ८५०० रुपये इतका आहे. सांगलीच्या हळद पावडरीला मागणी अधिक आहे. सर्वसाधारणपणे दररोज २०० ते ३०० टन हळदीची विक्री होत असून, पावडरीला प्रति क्विटंल ९५०० ते ११५०० रुपये असा दर मिळतो आहे. यंदा देशातून हळद आणि पावडरीची निर्यात वाढेल. हळदीचा हंगाम ६० टक्के पूर्ण झाला आहे. आता ४० टक्के हंगाम उरला आहे. या दरम्यान, हळदीच्या दरात फारशी तेजी-मंदी होण्याची शक्यता नसून दर स्थिर राहतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. 

सांगली बाजार समितीतील हळदीचे दर (प्रति क्विंटल) 
सेलम कणी  :
७८०० ते ८२०० 
देशी कडपा   : ७५०० ते ८००० 
मध्यम  : ८५०० ते ९००० 
उच्च सेलम  : ९००० ते १०५०० 
लगडी  : १०५०० ते ११५०० 

प्रतिक्रिया 
यंदा हळदीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात ८० लाख पोती हळदीचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. सांगली बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून हळदीचे दर स्थिर आहेत. तसेच सांगलीतून हळद पावडरची मागणीही वाढली आहे. त्यामुळे हळद पावडरीला दरही चांगले मिळत आहेत. 
- गोपाळ मर्दा, हळद व्यापारी, सांगली 


इतर अॅग्रोमनी
अन्नप्रक्रिया उद्योगासाठी १०,९००...नवी दिल्ली : देशातील अन्नप्रक्रिया उद्योगासाठी (...
सांगली बाजारात हळदीचे दर स्थिर सांगली ः गेल्या आठवड्यापासून हळदीचे दर स्थिर असून...
चीनच्या मागणीने शेंगदाणा दराला आधार पुणे : शेंगदाण्याची बाजारात गेल्या वर्षीच्या...
राज्यात शिल्लक साखरेचा बोजा कायम कोल्हापूर : यंदाचा साखर हंगाम अंतिम टप्प्यात येत...
लातूरला सोयाबीनचा भाव साडे पाच हजारावरलातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
हळदीच्या आवकेत वाढसांगली ः हळदीचा हंगाम सुरु झाल्यापासून सहा ते...
तूर आयातीचा परिणाम दीर्घकाळ कमीच राहील पुणे ः सरकारने वित्तीय वर्ष २०२१-२२ साठी ६ लाख टन...
राज्यातून २० लाख टन साखरनिर्यातीचे करार कोल्हापूर ः यंदा साखर उत्पादनाबरोबरच...
आयातीने तुरीच्या दरावर परिणाम शक्य पुणे ः उडीद आयातीला गेल्या आठवड्यात परवानगी...
आवक वाढूनही हरभरा दर टिकून पुणे ः यंदा हरभरा उत्पादनात घटीचा अंदाज आणि सण...
देशातील कापूस उत्पादन ३५८ लाख गाठींवर...नवी दिल्ली ः देशात यापूर्वी कापसाचे ३६० लाख गाठी...
मोहरीला दराचा ‘तडका’ पुणे ः राजस्थानमध्ये मोहरीच्या दराने हमीभावाचा...
हळदीची आवक वाढू लागली सांगली/परभणी ः बाजार समित्यांत हळदीची आवक वाढू...
देशात विक्रमी फलोत्पादनाचा अंदाज पुणे ः देशात २०२०-२१ मध्ये फलोत्पादनात फळांचे १०३...
चीनकडून शेतीमालाची आक्रमक खरेदी पुणे ः जागतिक पातळीवर जवळपास सर्वच शेतमालाची...
हरभरा दरात घसरणीची शक्यता कमीपुणे ः हरभरा आवक वाढत असून पुढील १० ते १२ दिवसांत...
तेलबिया उत्पादनात वाढ वॉशिंग्टन ः जागतिक तेलबिया उत्पादनात फेब्रुवारी...
सांगली बाजार समितीत हळदीची आवक वाढलीसांगली ः  कोरोना विषाणूचा वाढता...
सरकारी आकड्यांपेक्षा हरभरा उत्पादनात घट यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच पिकांना बदलत्या...
देशात साखर उत्पादनात ४० लाख टनांनी वाढलेकोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांनी...