agriculture news in marathi, Turmeric rate under pressure in market | Agrowon

बाजारात हळदीचे दर दबावात
अभिजित डाके
मंगळवार, 9 जुलै 2019

सांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण असल्याने उत्पादनात १० लाख पोत्यांनी वाढ झाली. मात्र, याचा फटका दराला बसला आहे. सध्या बाजारात गेल्यावर्षीच्या तुलनेत हळदीचे दर प्रतिक्विंटलला ८०० ते १००० कमी झाले आहेत. भविष्यात दरासंबंधी अनिश्‍चितता हळद उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण असल्याने उत्पादनात १० लाख पोत्यांनी वाढ झाली. मात्र, याचा फटका दराला बसला आहे. सध्या बाजारात गेल्यावर्षीच्या तुलनेत हळदीचे दर प्रतिक्विंटलला ८०० ते १००० कमी झाले आहेत. भविष्यात दरासंबंधी अनिश्‍चितता हळद उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

देशातील आंध्रप्रदेश, तमीळनाडू, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या हळद उत्पादन राज्यात सरासरी मागील वर्षी २ लाख ३० हजार हेक्टरवर लागवड होते. सन २०१८ मध्ये हळदीचे क्षेत्र स्थिर होते. देशात दरवर्षी सुमारे ७५ लाख पोत्यांचे (७० किलोचे पोते) हळदीचे उत्पादन होते. तर शिल्लक २० ते २५ लाख पोती असतात. त्यामुळे हळदीच्या दरात तेजी मंदी होते. शेवट्याच टप्प्यात हळदीच्या दरात प्रतिक्विंटलला ३००  ते ५०० रुपयांची वाढ होते. 

दरम्यान, गेल्यावर्षी हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यात चांगला पाऊस झाला, रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे हळदीचे उत्पादनात १० लाख पोत्यांनी वाढ झाली. हळदीचे ७५ लाखा पोत्यावरून ८५ लाख पोत्याचे उत्पादन झाले होते. गेल्यावर्षी २० ते २५ लाख पोती हळद शिल्लक होती. वास्तविक पाहता शिल्लक हळद आणि उत्पादन झालेली हळद अशी एक कोटी पाच लाख ते एक कोटी १५ लाख पोती बाजार विक्रीस आली. त्यामुळे मागणी कमी झाल्याने दरात तेजी झाली नाही. दोन वर्षांपूर्वी हळदीला ६ हजार ५०० ते १० हजार प्रतिक्विंटल असा दर मिळाला होता. गेल्यावर्षी हळदीचा दर प्रतिक्विंटल ८ ते ९  हजार रुपये इतकाच राहिला. त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. 

हळदीचे दर होणार कमी
सन २०१७ मध्ये हळदीचे उत्पादन ७५ लाख पोती झाले, शिल्लक पोती २० ते२५ लाख असे एकूण ९५ ते १ कोटी हळदीची पोती विक्रीस आली. सरासरी ९ ते १० हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर होता. मात्र, गेल्यावर्षी हळदीच्या मधल्या टप्प्यात ३०० ते ५०० रुपयांनी दर कमी झाले तर गेल्या महिन्यात हळदीच्या दरात पुन्हा ५०० ते ७०० रुपयांची घसरण झाली. अर्थात एका वर्षात सुमारे हळदीच्या दरात ८०० ते एक हजार रुपयांनी दर कमी झाले असल्याचे दिसते आहे. 

हळद उत्पादनाची स्थिती 

  • मागील वर्षी २ लाख ३० हजार हेक्टरवर लागवड
  • सात महिन्यांत १८ ते २० लाख पोत्यांची होणार विक्री
  • डिसेंबर अखेर २५ लाख पोती शिल्लक राहण्याची शक्यता
  • यंदा देशातील हळद उत्पादन करणाऱ्या राज्यात पाऊस चांगला असल्याने उत्पादन वाढण्याची शक्यता
  • मागणी नसल्याने शेतकऱ्यांनी हळदीची केली साठवणूक
  • देशात अंदाजे एक कोटी पोत्यांचे हळदीचे उत्पादन मिळत होते
  • हळदीची निर्यात कमी होत असल्याने दरावर परिणाम

देशातील राज्यनिहाय शिल्लक पोती

  • तमिळनाडू ः १२ ते १३ लाख पोती
  • महाराष्ट्र ः १६ ते १७ लाख पोती
  • तेलंगण आणि आंध्र प्रदेश : १३ लाख पोती

हळदीचे अधिक उत्पादनाचा परिमाण दरावर झाला आहे. त्यामुळे मंदीचे सावट निर्माण झाले आहे. मुळात हळदीची निर्यात होणे अपेक्षित होते. परंतु, हळदीची निर्यात झाली नाही याचा ही परिमाण दरावर झाला आहे. भविष्यात हळदीवर मंदीचे सावट येण्याची शक्यता आहे. 
- मनोहर सारडा, 
हळद व्यापारी, सांगली.

हळदीला शासनाने हमीभाव दिला पाहिजे. त्याबरोबर प्रक्रिया उद्योगासाठी प्रोस्ताहीत केले पाहिजे. तसेच देशातून हळदीची निर्यात कमी होते. हळदीच्या निर्यात वाढीसाठी चालना द्यावी, म्हणजे हळदीचे दर चढे राहतील.
- प्रमोद पाटील, शेतकरी, 
मौजे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली.

इतर अॅग्रोमनी
औरंगाबाद, जालना, बीडमध्ये ज्वारी,...औरंगाबाद : यंदाच्या रब्बी हंगामासाठी...
रब्बी मका, गहू, हरभऱ्याच्या दरात वाढीची...सध्या बाजारपेठेत आवकेची कमतरता आणि अति पावसामुळे...
वाॅलमार्ट कोळंबी आयातीसाठी वापरणार...नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातून कोळंबीची अमेरिकेसह...
दसरा, दिवाळीत बेदाणा दर वधारण्याची...सांगली  ः गेल्यावर्षीपेक्षा बेदाण्याचे...
आंतरपिकाच्या योग्य नियोजनातून लबडे ...पेरूच्या प्रत्यक्ष उत्पादनाला वर्ष- दीड वर्ष...
सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र...मुंबई  ः सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र...
सेंद्रिय शेतमालाचा आता ‘वनामती ब्रँड'नागपूर ः राज्यात सेंद्रिय शेतीचे दिशाहीन वारे...
मंदीतून सावरण्यासाठी उद्योग क्षेत्राला...पणजी : देशावर मंदीचे सावट असतानाच उद्योग जगताला...
हळद, गहू, हरभऱ्याच्या फ्युचर्स किमतींत...हळदीच्या डिसेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती...
शेतमालाच्या किमतीत स्थिरतेचा कलचीनकडून शेतमालाची आयात अजून वाढलेली नाही....
कृषी अर्थव्यवस्थेसाठीही मार्गदर्शक...ज्यांचे मोठेपण त्यांच्या हयातीतच समाजाला प्रतीत...
देशात मक्याची ७५ लाख हेक्टरवर लागवड नवी दिल्ली ः मागील आठवड्यात दक्षिण आणि मध्य...
सोयाबीन, हळद, गव्हाच्या फ्युचर्स...सोयाबीन फ्युचर्स किमती या सप्ताहात ५ टक्क्यांनी...
देशात कापूस लागवड क्षेत्रात वाढमुंबई ः चांगल्या पाऊसमानामुळे देशातील कापूस...
घरात काटकसर, पीक उत्पादनामध्ये...सांगली जिल्ह्यातील खटाव (ता. पलूस) येथील तात्यासो...
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलहळदीच्या नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती...
एचटी कापूस वाण परवानगीची बियाणे...नागपूर ः शेतकऱ्यांकडून अवैधरीत्या तणाला सहनशील (...
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
कागलचा शाहू कारखाना देशात सर्वोत्कृष्टनवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या...
पोल्ट्रीला धान्य पुरवठ्यासाठी...पुणे : विविध कारणांमुळे तोट्यात चाललेल्या लेअर...