Agriculture news in marathi Turmeric rates well; But a decline in production | Agrowon

हळदीचे दर चांगले; मात्र उत्पादनात घट 

टीम अॅग्रोवन
रविवार, 7 मार्च 2021

यंदा हळदीच्या दरात तेजी असल्याने शेतकऱ्याने समाधान मानावे, अशी स्थिती असताना दुसरीकडे या भागात हळदीच्या उत्पादनात सरासरी २५ टक्क्यांपर्यंत घट असल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

अकोला : हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून गेल्या काही वर्षात हळद पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यंदा हळदीच्या दरात तेजी असल्याने शेतकऱ्याने समाधान मानावे, अशी स्थिती असताना दुसरीकडे या भागात हळदीच्या उत्पादनात सरासरी २५ टक्क्यांपर्यंत घट असल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

हळद काढणीचा मोसम सुरू झाला आहे. टप्प्याटप्पाने या कामाला वेग येत आहे. कमी कालावधीत तयार होणाऱ्या जातीची हळद काढण्यात आली आहे. मात्र, सर्वाधिक पेरल्या जाणाऱ्या पारंपारिक वाणांची काढणी आता सुरू झाली. या हंगामात जास्त पाऊस झाल्याने काही भागात हळदीला कंदकुज दिसून आली होती. याचा फटका उत्पादनावर झालेला आहे. कंदकुज, करपा, धुक्यामुळे हळदीचे उत्पादन २० ते ४० टक्क्यांपर्यंत कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

दर चांगले पण उत्पादन कमी 
मागील गेल्या काही वर्षात हळदीचे उत्पादन चांगले येत होते. परंतु तेव्हा दर नव्हते. यंदा दर चांगले मिळत आहेत. दरांबाबत समाधान व्यक्त होत असताना दुसरीकडे उत्पादनाने फटका दिला. ज्या शेतकऱ्यांना १२५ ते १३० क्विंटलपर्यंत उतारा यायचा ते यंदा १०० क्विंटलपर्यंत येऊन थांबले आहेत. ही ओली हळद वाळविण्यानंतर मोठ्या प्रमाणात कमी होते. १०० क्विंटल ओली हळद उकळून सुकविल्यानंतर १८ ते २० क्विंटलपर्यंत राहते. काढणीचा खर्चही मोठा झेलावा लागतो. सध्या या भागात हळदीचा दर ७००० ते ८५०० रुपयांपर्यंत सांगितला जात आहे. 

प्रतिक्रीया 
यंदाच्या उत्पादनात २५ ते ४० टक्क्यांपर्यंत घट दिसून येत आहे. पाऊस जास्त झाल्याने कंदकुज झाली होती. शिवाय किडींमुळेही फटका बसलेला आहे. कमी दिवसांत तयार होणाऱ्या वाणाचा आम्हाला एकरी १२५ क्विंटलपर्यंत उतारा आलेला आहे. 
-सचिन कोकाटे, हळद उत्पादक, शिर्ला, ता. पातूर, जि. अकोला 

प्रतिक्रीया 
हळद काढणी सुरू झाली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेने मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट दिसून आली आहे. यामुळे दर वाढले तरी हळद उत्पादकाला याची झळ सहन करावी लागेल. 
-अनिकेत वाघमारे, हळद उत्पादक, मेहकर जि. बुलडाणा 


इतर ताज्या घडामोडी
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...