सांगलीत हळद प्रतिक्विंटल ५९०० ते १०४५० रुपये

हळद
हळद

सांगली ः येथील बाजार समिती जुन्या हळदीच्या आवकेला प्रारंभ झाला आहे. मंगळवारी (ता.१९) राजापुरी हळदीची ३२ क्विंटल आवक झाली होती. तीस प्रतिक्विंटल ५९०० ते १०४५० व सरासरी ८१७५ रुपये इतका दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. गुळाची आवक २८०७ क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटलला ३२०० ते ४२२५ रुपये असा दर होता. परपेठ हळदीची आवक १२२ क्विंटल झाली होती, तीस प्रतिक्विंटल ५५०० ते ८४४० रुपये असा दर होता. विष्णुअण्णा पाटील फळ व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची आवक १८०२ क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते ३३०० रुपये असा दर होता. बटाट्याची आवक २५० क्विंटल झाली. बटाट्यास प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये असा दर मिळाला. लसणाची आवक १३० क्विंटल आवक झाली होती. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये असा दर होता. मोसंबीची आवक १२२० डझन झाली होती, तीस प्रतिदहाकिलोस ३०० ते ५०० रुपये दर मिळाला. डाळिंबाची आवक १२५० डझन झाली होती, त्यास प्रतिदहा किलोस २०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. सफरचंदाची आवक ६४० पेटी झाली होती. सफरचंदाच्या प्रतिपेटीस ८०० ते १५०० रुपये असा दर होता. बोरांची २५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिक्विंटल ७०० ते २००० रुपये असा दर मिळाला. बाजार समितीतील शेतमालाची आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये) 

शेतीमाल     आवक     किमान     कमाल     सरासरी
लाल मिरची  ५४     ७०००     ८५००     ७७५०
ज्वारी (हायब्रीड)  ९८     १८००     १९००     १८५०
ज्वारी (शाळू)   २००     १८५०     २७५०     २२७५
बाजरी     ४८     १५००     १८०० १६५०
गहू १९३     १८००     २७००     २२५०
तांदूळ  ६९३     २२००     ३८००     ३६५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com