agriculture news in Marathi, turmeric sowing increased in country, Maharashtra | Agrowon

देशात हळद लागवडीत वाढ
अभिजित डाके
रविवार, 28 जुलै 2019

सध्या हळदीला पोषक वातावरण आहे. हळद पीक चांगले आले आहे. परंतु पाऊस जास्त झाला तर शेतकऱ्यांनी पाण्याचा निचरा करावा. रोगाचा प्रादुर्भाव झाला तर शिफारशीनुसार फवारणी घ्यावी.
- डॉ. मनोज माळी, प्रभारी अधिकारी हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज

सांगली ः जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यांत दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी हळद लागवडी उरकल्या. देशात यंदा पोषक वातावरण असल्याने आतापर्यंत २ लाख ३८ हजार हेक्टरवर हळदीची लागवड झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हळदीच्या क्षेत्रात ३.५५ टक्क्यांनी म्हणजेच ८ हजार हेक्टरने क्षेत्र वाढले असल्याची माहिती हळद संशोधन केंद्राच्या सूत्रांनी दिली.

देशात हळदीचे सरासरी क्षेत्र अडीच लाख हेक्टर इतके आहे. गेल्या वर्षी देशात कमी पाऊस, पाण्याची कमतरता यामुळे २ लाख ३० हजार हेक्टरवर लागवड झाली होती. लागवडीनंतर पावसाचा खंड, रोगाचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी अडचणीत आला होता. त्यामुळे उत्पादनात घट झाली होती.

मात्र, यंदा हवामान खात्याने वेळेत पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु पावसाला उशिरा सुरवात झाला. मात्र. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अनेक राज्यांमध्ये दमदार पाऊस झाला. यामुळे हळद लागवडीस प्रारंभ झाला. यंदा देशात २ लाख ३८ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा ८ हजार हेक्टरने लागवड वाढली आहे.

सध्या हळदीला पोषक वातावरण आहे. मध्यंतरी पावसाचा खंड पडला होता. पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे हळदीचे पीक चांगले बहरू लागले आहे. हळद पिकांची वाढ चांगली होऊ लागली आहे. सध्या रोगाचा प्रादुर्भाव कुठेही झाला नसल्याचे हळद संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

या राज्यातील हळदीचे क्षेत्र वाढले
हरियाना, त्रिपुरा, नागालॅंड, मणिपूर, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, बिहार, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यात देखील हळदीच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. 

 
राज्यनिहाय हळदीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
राज्य २०१८ २०१९
तेलंगण ५०,००० ५१,२००
तमिळनाडू २९,३०० ३०,८००
पश्चिम बंगाल १८,००० १९,०००
महाराष्ट्र  १९,७०० २१,३००
आंध्र प्रदेश १६,६०० १७,२००
आसाम १७,१०० १८,०००
इतर राज्य ८०,००० ८१,२००
एकूण २,३०,७०० २,३८,७००

 

इतर अॅग्रो विशेष
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...
एकरी सात टन भाताचे विक्रमी उत्पादनरत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य...
लष्करी अळीमुळे येतेय दूध व्यवसायावर संकटनगर ः मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या...
मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी...परभणी: मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी व्यापक...
शेतकऱ्यांमध्ये केलेल्या जनजागृतीतून...बुलडाणा  ः कृषी विभागाने लष्करी अळीच्या...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत होणार...नाशिक: बाजार समितीचे कार्यक्षेत्र निफाड...
लष्करी अळीची शेतकऱ्यांमध्ये धास्तीरुईखेड मायंबा, जि. बुलडाणा ः ‘‘अमेरिकन लष्करी...
फवारणी केलेला मका चाऱ्यात वापरू नका:...पुणे (प्रतिनिधी)ः  राज्यात सध्या मक्यावर...
लष्करी अळीमुळे डेअरी, पोल्ट्रीला १३००...पुणे : राज्यातील डेअरी व पोल्ट्री उद्योगासाठी...
बाजार समित्यांतील रोख व्यवहारांवरील...नवी दिल्ली ः रोखीच्या व्यवहारांवर नियंत्रण आणून...
अन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितचशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच...
मराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ! चिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक...
‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...
लष्करी अळीच्या नुकसानीचे पंचनामे का...औरंगाबाद : ‘‘शेती तोट्यात गेली, गावचं अर्थकारण...
जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्गजायकवाडी, जि. औरंगाबाद : जायकवाडी धरणामधून...
थकबाकीदार सूतगिरणीच्या संचालकांवर राज्य...मुंबई: कोट्यवधींचे कर्ज थकवल्याप्रकरणी राज्य...
रेशीम विभागाचा सुधारित आकृतीबंध...जालना: झपाट्याने वाढत असलेल्या रेशीम उद्योग व...
अमेरिकन लष्करी अळीकडून ४० टक्के मका फस्तपुणे: राज्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे...
लष्करी अळी आटोक्यात: कृषी विभागपुणे : राज्यात दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रातील...