agriculture news in Marathi, turmeric sowing increased in state, Maharashtra | Agrowon

हळदीची लागवड यंदा वाढली
टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

सध्या पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अडीच महिन्यांची भरणी करणे सोपे जाणार आहे. भरणी केल्याने कंद कुज, कंद माशी रोगाचा प्रादुर्भाव होत नाही; तसेच व्यवस्थापक करणे शक्‍य होईल.
- डॉ. मनोज माळी, प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना कसबे डिग्रज, ता. मिरज.

सांगली ः राज्यात अपेक्षित पाऊस झाल्याने हळदीची लागवड पूर्ण झाली आहे. राज्यात हळदीचे सरासरी क्षेत्र जवळपास १७ हजार ५०० हेक्‍टर असून, यंदाच्या हंगामात सुमारे २० हजार हेक्‍टर लागवड झाली आहे. गतवर्षीपेक्षा हळदीच्या क्षेत्रात २५०० हेक्‍टरने वाढ झाली आहे.

राज्याचे हळदीचे सरासरी क्षेत्र अंदाजे १७ हजार ते १८ हजार इतके आहे. राज्यात यंदा सुरवातीच्या टप्प्यात अपेक्षित पाऊस झाला. यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांनी लागवडीस प्राधान्य दिले. राज्यातील नांदेड, वसमत या दोन जिल्ह्यांत हळदीचे क्षेत्र अधिक आहे. त्याखालोखाल सांगली आणि सातारा जिल्ह्यांत हळद उत्पादन होते.

गेल्या वर्षी हळद हंगामात सुरवातीच्या काळात हळदीचा सरासरी ९ हजार ते १२ हजार प्रतिक्विंटल असा दर मिळाला. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात हेच दर सुमारे तीन हजार रुपयांनी कमी झाले होते. हळदीकडे पैसे देणारे पीक म्हणून पाहिले जाते. यामुळे बाजारात तेजी मंदी आली तरी शेतकरी याचा अभ्यास करून हळदीची विक्री करतात. 

राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतले जाते. मात्र, गेल्या वर्षी कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाचे उत्पादन वाया गेले. यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी कापूस पीक घेण्याऐवजी हळद पिकाची लागवड करण्यास पसंती दिली.

यामुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे, अशी माहिती हळद संशोधन केंद्राच्या सूत्रांनी दिली. गेल्या तीन वर्षांत सुमारे १५ हजार ते १८ हजार हेक्‍टरवर हळदीची लागवड झाली. तीन वर्षांचा आढावा घेतल्यास यंदा हळदीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. 

सांगली जिल्ह्यात २०० हेक्‍टरने वाढ
जिल्ह्यात हळदीचे दरवर्षी सुमारे ९०० ते १००० हेक्‍टर हळदीचे क्षेत्र असते. जिल्ह्यातील वाळवा, पलूस, मिरज, कडेगाव हळद उत्पादन घेणारे तालुके आहेत. यंदा हळदीच्या क्षेत्रात २०० हेक्‍टरने वाढ झाली आहे.

इतर अॅग्रो विशेष
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...
‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनच!देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...
एकरी सात टन भाताचे विक्रमी उत्पादनरत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य...
लष्करी अळीमुळे येतेय दूध व्यवसायावर संकटनगर ः मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या...
मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी...परभणी: मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी व्यापक...
शेतकऱ्यांमध्ये केलेल्या जनजागृतीतून...बुलडाणा  ः कृषी विभागाने लष्करी अळीच्या...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत होणार...नाशिक: बाजार समितीचे कार्यक्षेत्र निफाड...
लष्करी अळीची शेतकऱ्यांमध्ये धास्तीरुईखेड मायंबा, जि. बुलडाणा ः ‘‘अमेरिकन लष्करी...
फवारणी केलेला मका चाऱ्यात वापरू नका:...पुणे (प्रतिनिधी)ः  राज्यात सध्या मक्यावर...
लष्करी अळीमुळे डेअरी, पोल्ट्रीला १३००...पुणे : राज्यातील डेअरी व पोल्ट्री उद्योगासाठी...
बाजार समित्यांतील रोख व्यवहारांवरील...नवी दिल्ली ः रोखीच्या व्यवहारांवर नियंत्रण आणून...
अन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितचशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच...
मराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ! चिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक...
‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...