agriculture news in marathi Turmeric trades gets a major hold after corona outbreak | Agrowon

देशभरातील शेतकऱ्यांकडे ७० टक्के हळद पोती पडून

अभिजित डाके
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

बाजार समित्यांमधील सौदे सध्या बंद असल्याने देशभरातील शेतकऱ्यांकडे नव्या हळदीची ७० टक्के म्हणजेच सुमारे ५५ ते ६० लाख पोती पडून असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

सांगली : देशातील महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या प्रमुख राज्यांतील बाजारसमित्यांमध्ये हळदीचे सौदे होतात. परंतु, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर या बाजार समित्यांमधील सौदे सध्या बंद असल्याने देशभरातील शेतकऱ्यांकडे नव्या हळदीची ७० टक्के म्हणजेच सुमारे ५५ ते ६० लाख पोती पडून असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. परिणामी, या हळदीचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, बाजार समित्या अजून किती दिवस बंद राहणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

देशातील हळदीचा हंगाम सुरु झाला आहे. तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रात हळदीचे सौदे काढण्यात येत होते. साधारणपणे सौदे सुरु झाले की दोन महिन्यांत सुमारे ५० टक्के हळदीची विक्री होते. त्यानंतर दहा महिन्यांत ५० टक्के हळदीची विक्री होते.  मात्र, मार्च महिन्याच्या मध्यावधीतच देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झाली. या दरम्यान देशभरात २५ ते ३० टक्के हळदीची विक्री झाली होती. ‘कोरोना’चा प्रसार होऊ नये म्हणून  देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे बाजार समित्यांमधील सर्व पिकांचे सौदे बंद करण्यात आले. त्याकाळात बाजार समितीत हळद विक्रीसाठी आली होती. ती हळद आजही बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी आपल्या गोदामांमध्ये ठेवली आहे. अद्यापर्यंत हळदीसाठी प्रसिध्द असलेल्या बाजार समित्यांनी सौदे सुरु केलेले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हळद आपल्या घरातच ठेवली आहे. यामुळे हळदीचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गुंतवलेले भांडवल अडकले आहेत. हा खर्च कधी भरुन निघणार अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. वास्तविक पाहता मराठवाडयात गुढीपाडव्याला हळदीचे सौदे सुरु होतात. परंतू, तेथेही सौद्यांना अद्याप प्रारंभ झालेला नाही. 
...
‘हळदीच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता’
गेल्या चार ते पाच वर्षांपासून हळदीला सरासरी ७००० ते ९००० रुपये क्विंटल दर मिळत आहे. यंदा नव्या हळदीला १४ हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला. त्यानंतर दरात घसरण झाली. सौदे सुरु झाल्यानंतर हळदीच्या मागणीत वाढ होईल, परंतू दरावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

अशी आहे स्थिती

  •   हळद पावडर निर्मिती ठप्प.
  •   देशात हळदीचे उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता.
  •   हळद व पावडरीची निर्यात थांबली.
  •   हळद ठेवण्यासाठी शासकीय गोदामे उपलब्ध करुन देण्याची गरज.
  •   शासनाने सौदे सुरु करण्यासाठी पुढाकार घेण्याची शेतकऱ्यांची मागणी.

हळदीला अपेक्षित दर मिळत नाहीये. त्यातच ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सौदे बंद आहेत. त्यामुळे माझ्याकडील हळदीची ७० पोती घरातच ठेवली आहेत. मालाला उठाव नाही. त्यामुळे आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. 
— मनोज पाटील, हळद उत्पादक शेतकरी, पोखर्णी, ता. वाळवा, जि. सांगली.


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...