Agriculture news in Marathi Turmeric tubers rot in the soil | Page 2 ||| Agrowon

नांदेड : हळदीचे कंद जमिनीत सडले

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 सप्टेंबर 2021

गोदावरी नदीच्या पुरामुळे बागायती पिकांना मोठा फटका बसला आहे. पुराचे बॅकवाटॅर (उसावा) शेतात तीन दिवसांपेक्षा अधिक काळ साचून राहिल्यामुळे हळदीचे कंद जमिनीत सडून गेले आहेत.

नांदेड : गोदावरी नदीच्या पुरामुळे बागायती पिकांना मोठा फटका बसला आहे. पुराचे बॅकवाटॅर (उसावा) शेतात तीन दिवसांपेक्षा अधिक काळ साचून राहिल्यामुळे हळदीचे कंद जमिनीत सडून गेले आहेत. यामुळे मुदखेड तालुक्यातील वसंतवाडी, रोहीपिंपळगाव शिवारातील शेतकऱ्यांनी हळदीचे उभे पीक कापून काढण्याचा सपाटा लावला आहे.

जिल्ह्यात सहा व सात सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील लहान - मोठ्या नाल्यांना पूर आला होता. या सोबतच नांदेड शहराजवळील गोदावरी नदीवर असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पातही पाणीसाठा प्रचंड वेगाने वाढला. यामुळे नांदेड पाटबंधारे विभागाकडून प्रकल्पातील जलसाठा नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाचे पंधरा दरवाजे उघडून तब्बल अडीच लाख क्सुसेक वेगाने पाणी नदीत सोडले. यामुळे गोदावरी नदीला पूर आला होता. 

या दरम्यान गोदावरीला मिळणाऱ्या इतर उपनद्या तसेच नाल्याचा पूर पाठीमागे थोपला. यामुळे नदीकाठच्या हजारो एकरमधील पिकांना जलसमाधी मिळाली. यात ऊस, केळी, हळद या बागायती पिकांसह सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर अशा पिकांचे संपूर्ण नुकसान झाले. खरीप पिकांचा कोळसा झाल्यानंतर या भागातील हळदीचे कंद सडून गेले आहेत. यामुळे पीक वाळून जात असल्याने मुदखेड तालुक्यातील वसंतवाडी, रोही पिंपळगाव अशा अनेक गावातील शेतकरी मागील दोन दिवसापासून हळदीचे पीक कापून काढत आहेत. 

याबाबत वसंतवाडी येथील संभाजी महाजन शिंदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तीन दिवस पुराचे पाणी हळदीच साचून होते, यामुळे कंद सडले असून हळद वाळत होती. यामुळे गावातील चौघांनी हळद कापून काढली. आजपर्यंत एकरी चाळीस हजार खर्च झाला आहे. पुन्हा खर्च करून पीक सुधारले नाही तर ते परवडणार नाही, यामुळे हळद कापून काढल्याचे ते म्हणाले.


इतर अॅग्रो विशेष
दहा वर्षांवरील हरभरा वाणांना अनुदान नाहीपुणे ः राज्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना हरभरा...
प्रक्रिया उद्योगातून शेती झाली किफायतशीरमानकरवाडी (ता. जावळी, जि. सातारा) येथील संगीता...
यंदा कापूस तेजीतच राहणारपुणे : महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात...
पावसाने वाढली सोयाबीनची आवक नागपूर ः मध्य प्रदेशात पावसाच्या शक्‍यतेमुळे...
ड्रायपोर्टमुळे संत्रा निर्यातीला चालनानागपूर : वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे...
शेतीमाल साठवणूक, तारण कर्ज, ब्लॉकचेनची... पुणे : राज्य वखार महामंडळाच्या शेतीमाल...
मतदार नोंदणीसाठी राज्यभरात...नागपूर : राज्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये १६...
अकोल्यातील सिंचन प्रकल्पांच्या...अकोला ः जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांची देखभाल...
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
गोड्या पाण्यात निर्यातक्षम व्हेमानी...गोड्या पाण्यात कोळंबी व त्यातही ‘व्हेनामी’ जातीचे...
‘ऑयस्टर’ मशरूमला मिळवली बाजारपेठसांगली जिल्ह्यातील बावची येथील प्रदीप व राजेंद्र...
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...